अंकुर त्यागी, झी मीडिया : झगमगाटात नाहून निघालेली आणि कधीही न थकणारी मायानगरी मुंबई (Mumbai) मागच्या काही दिवसांपासून भलत्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत पोर्नोग्राफीचं प्रकरण शमत नाही. तोच आता (sextortion ) सेक्सटोर्शनबाबत मोठा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग... 
पोलिसांनी सेक्सटोर्शनबाबत माहिती देत सांगितल्यानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मंडळी सेलिब्रिटींशी संपर्क वाढवून आणि अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना सतवण्यास सुरुवात करत होते. तपास यंत्रणांना चकवण्यासाठी म्हणून या रॅकेटसाठी काम करणाऱ्यांनी नेपाळमधील बँक खात्याचा वापर केला. 


मुंबई पोलिसांच्या हाती तपासादरम्यान आलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये 258 लोकांना अडकवण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूडचे 100 आणि टेलिव्हिजन विश्वातीलही काही मोठे सेलिब्रिटी गळाला लागले होते. सदर प्रकरणात पोलिसांनी नागपूर, ओडिशा, गुजरात आणि कोलकाता येथून 4 जणांना अटक केली आहे. यापैकी दोघे अल्पवयीन असून, एकजण इंजिनियर आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून मोबाईल, 12 बनावट खाती, 6 बनावट ईमेल आयडी आणि इतर उपकरणं ताब्यात घेण्यात आली आहेत. 


मागणी येताच न्यूड व्हिडीओ पुरवत होते... 
सेलिब्रिटींशी संपर्क साधत, जवळीक वाढवत त्यांचे अश्लील व्हिडीओ काढण्याचं सत्र या टोळीनं सुरु केलं. ज्यानंतर सेलिब्रिटी आणि त्यांच्या जाळ्यात अडकलेल्यांकडून ही टोळी लाखो रुपये घेत होती. इतकंच नव्हे तर या व्हिडीओतील काही शॉट्स, स्क्रीनग्रॅब ट्विटर, डार्कनेट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या किंमतीला विकले जात होते. ज्या सेलिब्रिटीचा न्यूड व्हिडीओची मागणी येईल तसा व्हिडीओ पुरवला जात होता. 


सर्वप्रथम या टोळीतून कोणीतरी स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मैत्री करत होतं. ज्यानंतर 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटल्यानंतर या व्यक्तीला आपल्या जाळात अडकवलं जात आणि मग व्हिडीओ कॉलवर संपर्क साधत त्यांना न्यूड येण्याचा आग्रह केला जात असे. पुढे त्यांचा न्यूड व्हिडीओ शूट केला जात असे ज्यानंतर सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ पोस्ट करुन मोठ्या रकमेची मागणी केली जात असे. 


अतिशय धक्कादायक असा हा प्रकार उघडकीस आल्यामुळं आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर कितपत विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्च आहे.