‘इफ्फी’ने वगळलेल्या ‘सेक्सी दुर्गा’ सिनेमाचा ट्रेलर
सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यावर ‘सेक्सी दुर्गा’ या सिनेमाच्या नावातच दिग्दर्शकाला बदल करावा लागला आहे.
मुंबई : सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यावर ‘सेक्सी दुर्गा’ या सिनेमाच्या नावातच दिग्दर्शकाला बदल करावा लागला आहे.
या सिनेमाच्या टायटलमुळे काही धार्मिक संघटनांमध्ये चांगलाच रोष बघायला मिळत आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने ‘सेक्सी दुर्गा’ हे टायटल ‘एस दुर्गा’ असं केलंय. इतकेच नाहीतर सिनेमात २१ जागांवर ऑडिओ म्यूट करावा लागला आहे. या सिनेमात राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत आहे.
सनल कुमार शशिधरन हा एक मल्याळम फिल्ममेकर आहे. आपल्या वेगळ्या कामामुळे त्याचं अनेकदा कौतुकही झालं आहे. पण ‘सेक्सी दुर्गा’मुळे चांगलाच वाद ओढवला गेलाय. त्यानंतर ‘इफ्फी’मधूनही या सिनेमाला आणि रवि जाधव यांच्या ‘न्यूड’ सिनेमाला वगळण्यात आलंय. त्यामुळे सिने इंडस्ट्रीत चांगलंच वातावरण तापलं आहे. या सिनेमात आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा ट्रेलर बघा....