`या` 5 प्रचंड महागड्या गोष्टींचा मालक आहे Shah Rukh Khan
शाहरुखकडे असणाऱ्या महागड्या वस्तू पाहून म्हणाल, आमच्या सात पिढ्या बसून खातील
Shah Rukh Khan 5 Most Expensive Things: अभिनेता शाहरुख खान आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. 90 च्या दशकातील अभिनेता म्हणजे शाहरुख. शाहरुख फक्त त्याच्या प्रोफेशन आयुष्यामुळेच नाही तर, खासगी जीवनामुळे देखील चर्चेत असतो. गौरी खान आणि मुलांवर अलेलं प्रेम... इत्यादी गोष्टी अभिनेत्याबद्दल चाहत्यांना माहिती आहे. पण शाहरुखच्या आयुष्यातील पाच महागड्या वस्तू कदाचित फार कमा लोकांना माहिती आहेत.
शाहरुखाच्या आयुष्यातील 5 सर्वात महागड्या गोष्टी...
मन्नत (Mannat)
शाहरुख खानकडे अशा अनेक मालमत्ता आहेत पण त्याचं घर 'मन्नत'..., अभिनेत्याचा 'मन्नत' राजवाड्यापेक्षा कमी नाही. शाहरुख खानचं घर ही त्याची सर्वात महागडी मालमत्ता मानली जाते. अभिनेत्याने हे घर पारसी कुटुंबाकडून 13.4 कोटींना विकत घेतलं होतं पण आज त्याची किंमत 200 कोटींहून अधिक आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन्स (Red Chillies Entertainment Productions)
शाहरुख खान अभिनयासोबतच प्रॉडक्शन हाऊसमधूनही कमाई करतो. नुकताच त्याच्या प्रोडक्शन हाऊसचा 'डार्लिंग्स' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या सिनेमाला खूप प्रशंसा मिळाली. रिपोर्टनुसार सिनेमाने 400 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.
कोट्यवधींचं कार लक्षणं (cars worth crores)
अभिनेत्याकडे एक-दोन नव्हे तर अनेक वाहनं आहेत. ज्यामध्ये जगातील सर्वात महाग बुगाटी वेरॉन 14 कोटींची कार आहे. यानंतर शाहरुखकडे 4 कोटींची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, 4.1 कोटींची रोल्स रॉयस, 2.6 कोटींची BMW i8, 2 कोटींची BMW 7, BMW 6 सीरिजची कार 1.3 कोटी रुपयांची आहे. त्याच्याकडे एक व्हॅनिटी देखील आहे ज्याची किंमत 3.8 कोटी रुपये आहे.
IPL टीम (IPL team)
शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 600 कोटी आहे.
शाहरुखची परदेशातील संपत्ती (Shahrukh's foreign assets)
रिपोर्टसार, लंडनमधील पॉश एरिया पार्क लेनवर शाहरुख खानचा सुमारे 172 कोटी रुपयांचा बंगला आहे. यासोबतच दुबईच्या प्रसिद्ध पाम जुमेराहमध्ये अभिनेत्याचा सुमारे 110 कोटींचा बंगला आहे.