मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी आणि आनंद पिरामल लग्नबंधनात अडकलेत. १२ डिसेंबरला दोघं रेशीमगाठीत अडकले. या शाही विवाह सोहळ्याला बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी, देश-विदेशातले मान्यवर उपस्थित होते. या लग्नातील एक व्हिडीओ समोर आलाय. ईशाच्या लग्नातील या व्हिडीओमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन, बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान वाढपी झाल्याचे पाहायला मिळत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात बॉलीवूड, उद्योगजगत, राजकारण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. ईशा आणि आनंद १२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी हजारो कोटी खर्च करण्यात आले.


शाहरुख खान

स्वागत सोहळ्याला ए.आर.रेहमान, उदीत नारायण, शान, हरदीप अशा गायकांनी आपल्या सूरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.