Shikha Malhotra : 2020 च्या सुरुवातीला जेव्हा कोरोना आला तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. सगळ्यांचं आयुष्य जसं पूर्ण थांबलं होतं. त्यावेळी अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. तर अशा परिस्थितीत काही लोक देवासारखे त्यांच्या मदतीला धावून आले. त्यापैकी एक म्हणजे शिखा मल्होत्रा. शिखानं कोरोना काळात नर्स म्हणून काम केले. त्यानंतर तिच्यासोबत जे झालं त्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिखा मल्होत्रा कोण आहे? शिखानं शाहरुखच्या 'फॅन' चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. त्या चित्रपटानंतर शिखानं 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांचली' या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'कांचली' चित्रपटात तिच्यासोबत संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. एक अभिनेत्री म्हणून करिअर करण्या आधी शिखानं नर्सिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे जेव्हा कोरोनानं सगळ्यांचं आयुष्य थांबवलं आणि त्यांची वाईट परिस्थिती पाहता. तिनं सगळ्यांच्या मदतीला धावून येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिखा नर्स म्हणून BMC रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होती. त्या परिस्थितीत तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल, जर तिला काही झालं तर असा कोणताही प्रश्न समोर न ठेवता ती सगळ्यांच्या मदतीला धावून गेली. पण एक दिवस शिखा कोव्हिड पॉझिटीव्ह झाली. त्यातून कशी बशी बाहेर पडत असताना अचानक तिला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यातून बाहेर आली आणि लगेच तिला पॅरालिसिसचा झटका आला होता. या सगळ्यांना लढा देत असतानाच तिला स्ट्राइडची समस्या झाली आणि तिचं वजन वाढलं. 



शिखा आता हळू हळू रिकव्हर करते. आता ती आधीसारखी फिट झाली आहे. तर आता ती आधी पेक्षा जास्त ग्लॅमरस झाली आहे असं म्हणू शकतो. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील बिकिनीतील फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शिखासाठी हा प्रवास सोपा नव्हता. तिनं खूप त्रास सहन केला आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूप चांगली इच्छा शक्ती ठेवली. तिच्या ट्रान्सफॉर्मशेनला पाहून सगळ्यांना जनू आश्चर्य झालं. शिखा मल्होत्राच्या ट्रान्सफॉर्मेशनविषयी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. दरम्यान, शिखाचे हजारो चाहते असून इन्स्टाग्रामवर 157K फॉलोवर्स आहेत. दरम्यान, तिचा हा प्रवास ऐकतान अनेकांना आश्चर्य झाले आहे.