Aryan Khan ला सोडवण्यासाठी शाहरुखनं पाठवलेल्या पैशांचं काय झालं?
फसवेगिरी करत असल्याचं लक्षात येताच शाहरुखकडून हे पैसे ...
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला न्यायालयानं जामीन मंजूर केला आणि किंग खानसाठी हा मोठा दिलासा ठरला. पण, आता आर्यनच्या जामीनानंतर काही खुलासे होत आहेत. ज्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार प्रभाकर साईलनं दिलेल्या अॅफिडेविटमध्ये नमुद करण्यात आलेल्या सॅम डिसुजा यानं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावा केला आहे.
शाहरुखच्या वतीनं त्याची मॅनेजर पूजा ददलानी हिनं आर्यनला वाचवण्यासाठी म्हणून पैशांची व्यवस्था केली होती. पण आर्यनची सुटका करणं शक्य नसल्याचं लक्षात येताच शाहरुखचे पैसे परत दिले गेले.
व्यावसायिक असणाऱ्या डिसूजानं दावा केल्यानुसार पूजा ददलानीनं 50 लाख रुपये दिले होते. के.पी. गोसावींकडे त्यांनी हे पैसे दिले होते.
गोसावी फसवेगिरी करत असल्याचं लक्षात येताच शाहरुखकडून हे पैसे परत मागितले गेले.
दरम्यान, साईलने त्याच्या अॅफिडेविटमध्ये नमूद केल्यानुसार गोसावी, ददलानी आणि डिसूजा 3 ऑक्टोबरला भेटले होते. एक व्यक्ती कारमध्ये आला आणि त्यानं पैशांनी भरलेल्या दोन बॅगा साईलला दिल्या. ज्यानंतर त्यानं त्या बॅगा डिसूजाकडे ट्रायडंटमध्ये नेल्या.
डिसूजानं पैसे मोजले आणि ते फक्त 38 लाख रुपये असल्याचं सांगितलं. पैशांचा हा मोठा व्यवहार सध्या सर्वांना थक्क करुन जात आहे. यापूर्वी 25 कोटींचा व्यवहार झाल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या. ज्यामधील 8 कोटी रुपये एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांना देण्य़ात येणार असल्याचं म्हटलं गेलं.
बऱ्याच शाब्दीक बाचाबाचीनंतर गोसावीकडून 38 लाख वसूल करण्यात आले, ज्यानंतर उरलेल्या पैशांची बचत करत ते पूजा ददलानीला परत देण्यात आले होते.