मुंबई : शाहरूख आणि गौरी खान सारखी मॅजिकल लव स्टोरी बॉलिवूडमध्ये फार कमी पाहायला मिळते. आज या दोघांच्या लग्नाला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मॅरेज अॅनिवर्सरी निमित्त जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी.... शाहरूख आणि गौरीची लव्हस्टोरी ही अगदी सिनेमातील कथेप्रमाणे आहे. दोघांना एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला, शेवटी प्रेमाचा विजय झाला.  या दोघांची पहिली भेट ही 1984 मध्ये एका कॉमन मित्रामुळे झाली. तेव्हा शाहरूख फक्त 18 वर्षांचा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टीत गौरी एका दुसऱ्या मुलासोबत डान्स करत होती. शाहरूखला त्याच क्षणी गौरी पसंत आली. केव्हा त्याने गौरीला डान्स करता विचारलं. तेव्हा तिने शाहरूखला नकार देत सांगितलं की, मी आपल्या बॉयफ्रेंडची वाट बघत आहे. 



हे ऐकताच शाहरूख खानचं मन खट्टू झालं. मात्र सत्य परिस्थिती होती की, तिचा कुणीही बॉयफ्रेंड नव्हता. गौरीचा भाऊ तेव्हा तिच्यासोबत होता म्हणून गौरीला खोटं बोलावं लागलं होतं. ही गोष्ट स्वतः शाहरूख खानने एका मुलाखतीत सांगितली होती. पुढे शाहरूख म्हणाला की, मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मी गौरीला म्हटलं की, मला पण तुझा भाऊ समज. 


तेव्हापासून या नात्याला सुरूवात झाली. गौरीला शाहरूखचा आत्मविश्वास आणि स्टाइल अतिशय आवडत असे. शाहरूख गौरीसाठी खूप पजेसिव असे त्याला गौरी इतर कुणाला भेटते हे कधीच पसंत नव्हतं. त्यावेळी गौरीला असं वाटलं देखील की, या दोघांनी आपल्या रिलेशनमध्ये ब्रेक घ्यायला हवा. 



गौरी एकदा वाढदिवसादिवशी आपल्या मित्रपरिवारासोबत आऊट ऑफ स्टेशन गेली. आणि ही गोष्ट तिने शाहरूख खानला सांगितली नाही तेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो गौरीपासून दूर राहू शकत नाही. शाहरूख आपल्या आईच्या अगदी जवळ होता. त्यामुळे त्याने ही गोष्ट त्यांना सांगितली आणि आईनेही अगदी लगेचच 10 हजार काढून दिले आणि तिला शोधून आणण्यास सांगितले. 


खूप शोधल्यानंतरही गौरी शाहरूखला भेटली नाही. पण खूप वेळाने एका बीचवर गौरी शाहरूखला दिसली.  पाहता क्षणी या दोघांना खूप रडू कोसळले आणि त्याच क्षणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


पण खरी परिक्षा तर पुढे होती. कारण धर्म हा या दोघांच्या लग्नातला सर्वात मोठा अडथळा होता. शाहरूख मुस्लिम आणि गौरी हिंदू होती. तसेच गौरीचे वडिल पूर्णपणे शाकाहारी होते त्यामुळे गौरीचे पालक कधीच या लग्नासाठी तयार झाले नसते. आणि तेव्हा शाहरूख सिनेमांमध्ये स्ट्रगल करत होता. 


या दोघांचा रिलेशनशिपमधील स्ट्रगलदेखील खूप काळ सुरू होता. शाहरूख खानने गौरीच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी 5 वर्षे हिंदू असल्याचं नाटक केलं. त्याने याकरता आपलं नाव देखील बदललं होतं. आणि अखेर ते शाहरूख खानच्या स्वभावाने इम्प्रेस झाले आणि 25 ऑक्टोबर 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं.