मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजन करत आहेत. सध्या शाहरुख आणि मालिकेतील बोल्ड अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता मालिकेतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं तर सर्वांच्या लक्षात आलं असेल की ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुनमून दत्ता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुनमून नर्स तर शाहरुख रुग्ण म्हणून दिसत आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे शाहरुख रुग्णालयात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे मुनमून तिच्यावर उपचार करत आहे.



शाहरुख सोबत काम केल्यानंतर आलेला आनंद मुनमूनच्या चेहऱ्यावर दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फार जुना एका जाहिरातीचा आहे. एका पेनच्या जाहिरातीमध्ये शाहरुख आणि मुनमून यांनी एकत्र काम केल होतं. 


अनेक वर्षांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुनमून सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी.