Shahrukh Khan : आपल्या गोड आवाजानं सगळ्यांची मने जिंकणारी पूजा आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटीला येत आहे. पूजा हे नाव वाचताच तुम्हाला चित्रपटातली जी पूजा आठवली तिच आहे ही पूजा. ही पूजा रात्री उशिरा फओनवर पुरुषांशी बोलते. आता ही पूजा पूर्वी पेक्षा जास्त हॉट झाली आहे. नुकतीच पूजा बॉलिवूडच्या पठाणशी बोलताना दिसली. पूजानं पठाणला इम्प्रेस करण्यासाठी केवळ सुंदर कपडे परिधान केले नाही तर त्याला फोनवरून एक किसही दिली आहे. हे पाहिल्यानंतर सगळ्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजाचा हा व्हिडीओ बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानानं (Ayushmann Khurrana) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा बॅकलेस ब्लाऊज घालून बसल्याचे दिसते. तेवढ्यात पूजाचा फोन वाजतो आणि ती बोलते, 'हॅलो, मी पूजा बोलते'. तेव्हा समोरची व्यक्ती किंग खानच्या आवाजात म्हणते आणि 'मी पठाण आहे'. यानंतर पूजा म्हणाली, माझा पठाण कसा आहेस? म्हणूनच शाहरुख खान म्हणतो- 'पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत. व्हॅलेंटाईन डेच्या पूजाला  शुभेच्छा. यानंतर पूजा बोलते, 'मी पण पूर्वीपेक्षा जास्त हॉट, क्यूट आणि सुंदर आहे.' माझा 'जवान' लवकरच येणार असल्याचे पठाण सांगतो. मग पूजा म्हणते आणि लवकरच मेरी जवानी.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Valentine's Day : प्रेमासाठी 'या' कलाकारांनी केली हद्द पार; कोणी रक्तानं लिहिलं पत्र, तर कोणी संपूर्ण शरीरावर काढले टॅटू


'ड्रीम गर्ल 2' चा (Dream Girl 2) हा मजेशीर टीझर काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पठाण आणि पूजच्या नॉटी टॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचे हे बोलणे नेटकरी एन्जॉय करत आहेत. हा टीझर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करण्यात आली आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा टीझर शेअर करत आयुषमाननं कॅप्शन दिलं आहे की 'ब्रेकिंग न्यूज... पूजा ड्रीम गर्ल परत आली आहे... 7 ला एकत्र बघू.' दरम्यान, या चित्रपटात पूजासोबत मुख्य भूमिकेत आयुषमानसोबत अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्सनं केलं आहे. चित्रपटात 'करमवीर' ही व्यक्तिरेखा साकारत असलेला आयुषमानच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे.