मुंबई :  दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) चा आगामी सिनेमा 'मिस्टर इंडिया 2' (Mr.India 2) च्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अली अब्बास जफर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट या सिनेमाची घोषणा केली आहे. 'मिस्टर इंडिया 2' नावाची सीरिज बनवण्यात येणार आहे. या सिरीजला दोन भागांत बनवली जाणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा सुरूवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाच्या निर्मितीबाबत अली अब्बास जफर यांनी Mr.India च्या निर्मात्यांशी चर्चा केली नाही, असा आरोप शेखर कपूर आणि सोनम कपूर यांनी केला आहे. मूळ निर्मात्यांशी सिनेमाबाबत चर्चा करणं महत्वाचं असणार आहे. 



असं असताना आता चर्चा रंगली आहे की, बॉलिवूडचा किंग खान शाहरूखनने आणि रणवीर सिंहने सिनेमाकरता लूक टेस्ट दिली आहे. मोगॅम्बोच्या कॅरेक्टर करता या दोघांनी लूक टेस्ट दिली आहे. शाहरूख खानने अतिशय भरलेला ड्रेस घालून शूट केलं आहे तर रणवीर सिंहने सिंपल असा कोट-पँट घालून शुटिंग केली आहे. 



रणवीर सिंहचा लूक जर फायनल झाला तर तो मिस्टर इंडिया म्हणजे अनिल कपूरची भूमिका साकारणार आहे. तसेच शाहरूख खान मोगॅम्बोची भूमिका साकारणार आहे. तसेच सिनेमा आणि त्याच्या कास्टिंगबद्दल अधिकृत अशी कोणतीच घोषणा झालेली नाही. हा सिनेमा अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया'चा रिमेक आहे की त्यापुढची कथा सांगणारा सिनेमा हे पाहण्यासारखं आहे.