शाहरुख खानला बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' देखील म्हटले जाते. चित्रपटसृष्टीतील जवळपास प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असतं की, पडद्यावर एकदा तरी शाहरुख खानसोबत रोमान्स करायला मिळावा. दीपिका, अनुष्का, जुही, राणी, काजोल अशा अनेक अभिनेत्रींसोबत किंग खानची जोडी हिट ठरली आहे. या सर्व सौंदर्यवतींना घेऊन त्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, यापैकी कोणतीही अभिनेत्री शाहरुख खानची आवडती नाही. तर किंग खानला मात्र दुसरीच अभिनेत्री आवडते. ती बॉलिवूडची सुपरस्टार आहे.


शाहरुख खानची आवडती अभिनेत्री कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या बॉलिवूड अभिनेत्रीवर शाहरुख खानचा क्रश आहे. त्याबाबत किंग खानने अनुपम खेरच्या 'द अनुपम खेर शो- कुछ भी हो सक्ता' या टॉक शोमध्ये उत्तर दिलं आहे. त्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या अभिनेत्रीचं उत्तर देताना शाहरुख जोडा लाजला आणि अभिनेत्री मुमताज यांचं नाव त्याने घेतलं. अभिनेत्याने हे देखील उघड केले की तो लहान असताना मुमताज यांच्यावर क्रश असायचं आणि जेव्हाही तो त्यांची कोणतीही गाणी पाहतो तेव्हा तो नाचू लागतो.


मुमताज बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टार 


 मुमताज त्यांच्या काळातील सुपरस्टार होत्या. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. त्या मोठ्या झाल्यावर अभिनेत्री म्हणून काम करू लागली. त्यानंतर 'मुझे जीने दो' सारख्या हिट चित्रपटात छोट्या भूमिका मिळाल्या. सुपरस्टार होण्यापूर्वी अभिनेत्रीला अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. इंडियन आयडॉलमध्ये येताना मुमताजने खुलासा केला होता की, त्यांच्या विरुद्ध काम करण्यास कोणताही नायक तयार नाही. मात्र, दारा सिंह यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना फौलाद चित्रपटात काम करण्याची संधी दिली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.


अभिनेत्रीने दारा सिंगसोबत वीर भीमसेन, टारझन कम्स टू दिल्ली, सिकंदर-ए-आझम, रुस्तम-ए-हिंद, राका आणि डाकू मंगल सिंग यासह 16 चित्रपट केले. नंतर त्यांची राजेश खन्नासोबतची जोडी ब्लॉकबस्टर ठरली. मुमताज यांनी त्याच्यासोबत 10 चित्रपट दिले आणि ते सर्व ब्लॉकबस्टर ठरले.