मुंबई : ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानला कोर्टाने सोमवारी 7 ऑक्टोबरपर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत पाठवलं आहे. एनसीबीने अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांची चौकशी केली. ज्यांना त्याच्यासह अटक करण्यात आलं होतं, त्यांनी पूर्ण दोन दिवस चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले. आर्यनने त्याच्या 4 पानांच्या स्टेटमेंट एनसीबीला बरंच काही सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालानुसार, आर्यन आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणाला, 'माझे वडील शाहरुख खान खूप व्यस्त असतात. सध्या ते एकाचवेळी 3 चित्रपटांचं शूटिंग करत आहेत. ते इतके व्यस्त आहेत की, त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला त्यांच्या असिस्टंट पूजाची अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलंय की, त्याने परदेशातून चित्रपट निर्मितीचा कोर्स केला आहे.


आर्यन खानच्या विरोधात न्यायालयात एनसीबीने सांगितलं की, आर्यनच्या फोनवरून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट सापडले आहेत. आरसीन खान 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. असंही म्हटलं जात आहे की, आर्यनने व्हॉट्सअॅप चॅटमध्ये रोख रकमेच्या व्यवहाराबद्दल बोलले आहेत आणि त्याने यूके आणि दुबईमधून ड्रग्ज देखील घेतले होते. जर एनसीबीने आपला दावा सिद्ध केला तर आर्यनसाठी समस्या वाढू शकतात.


दरम्यान, अशी बातमी आहे की, आर्यन खानने न्यायालयात सुनावणी दरम्यान त्याचा नोज स्प्रे मागितला होता. एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुनसह पकडलेल्या इतर 5 आरोपींनाही अटक केली आहे. या सगळ्या आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. असं एनसीबीने न्यायालयाला सांगितलं आहे.