खरा शाहरूख ओळखा कोणता?...शाहरूखसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण?
शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या इब्राहिम कादरीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मुंबईः बॉलीवूडमधील अनेक कलांकारांसारखे हुबेहुब दिसणारे त्यांचे चाहत्यांची चर्चा होत असते. कधी योगायोगाने चेहऱ्यात साम्य असतं तर कधी चाहत्यांकडून नकल केली जाते.
अलीकडेच, शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या इब्राहिम कादरीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इब्राहिम शाहरुखसारखा दिसतो.इब्राहिम कादरीची बोलण्याची शैली आणि बोलण्याची पद्धत किंग खानशी मिळतीजुळती आहे.
सोशल मीडियावर इब्राहिम कादरी यांचा फोटो पाहिल्यानंतर चाहते चक्रावले आहेत, दोघे शेजारी उभे राहिल्यास खरा शाहरूख ओळखणं कठीण होईल इतके ते दोघे सारखे दिसतात. कोण आहे इब्राहिम कादरी, जो शाहरुखला त्याच्या लूकमध्ये खूप टक्कर देतोय, पाहुयात
इब्राहिम कादरी हा तरुण सध्या त्याच्या दिसण्यामुळे चर्चेत आहे. इब्राहिम कादरी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
शाहरुख खानसारखा लूक बनवून त्याने बरीच ओळख मिळवली आहे. शाहरुख खानसारखं दिसण्याने स्वतःशी संबंधित एक किस्सा इब्राहिमने सांगितला की, एकदा शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला मध्येच घेरले. त्यानंतर त्याला त्या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी पोलिसांना बोलावावे लागले.
इब्राहिम कादरी सांगतो की, मी आणि माझे मित्र जेव्हा रईस चित्रपट पाहायला गेलो होतो, तेव्हा लोकांनी मला पाहताच मला जॉईन केले. सेल्फी काढायला सुरुवात केली आणि चाहत्यांनी मला घेरले.
इब्राहिम सांगतो, किंग खानसारखे दिसण्याचे दुष्परिणामही अनेक आहेत. मी एकदा गर्दीत अडकलो होतो. कोणीतरी माझा टी-शर्ट फाडला, तर कोणी मला घट्ट पकडले. मला स्टेडियममधून बाहेर पडण्यासाठी पोलिसांना बोलावावे लागले.