Shah Rukh Khan getting discharge from hospital : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बुधवारी उष्माघाताचा त्रास (Heat Stroke) जाणवू लागल्याने अचानक अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किंग खानवर अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचार सुरू होते. शाहरूखला भेटण्यासाठी त्यावेळी अभिनेत्री आणि बिझनेस पार्टनर प्रिती झिंटा देखील आली होती. तर पत्नी गौरी देखील लगेच अहमदाबादमध्ये दाखल झाली. अशातच आता किंग खानच्या प्रकृतीविषयी मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) पोस्ट शेअर करत माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांना शाहरुखला डिस्चार्ज दिल्यानंतर आता तो मुंबईत परतला आहे. अशातच आता शाहरुखच्या मॅनेजरची पोस्ट व्हायरल झालीये. 'मी मिस्टर खान यांच्या चाहत्यांना सांगू इच्छिते की, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल, काळजीसाठी आणि प्रार्थनेसाठी मनापासून आभार', असं पूजा ददलानीने म्हटलं आहे.


शाहरुख खान मंगळवारी 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता. केकेआर आणि सनराइजर्स हैदराबादमध्ये आयपीएलचा क्वालीफायर सामना सुरु होता. त्यासाठीच शाहरुख खान तिथे पोहोचला होता. त्यानंतर शाहरूखने सामना संपल्यानंतर जल्लोष देखील केला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला.


उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा?


उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणं टाळावं. बाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, कॅप, हॅट आणि छत्री वापरा. आपलं डोकं नेहमी झाकून ठेवा. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल फळाचे सरबत, कोकम सरबत यांसारख्या पेयांचा वापर तुम्ही करू शकता. आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा, त्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहतं. शक्य असेल तितकं चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळा.