Shah Rukh Khan Viral Video : अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा 'पठाण' सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शहरुखचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने शाहरुखला मुसलमान आणि हिंदू धर्माबद्दल प्रश्न विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखसोबत प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर देखील दिसत आहे. दरम्यान एक व्यक्ती शाहरुखला विचारतो, 'जर तू हिंदू असता, तुझं नाव वेगळं असतं... तुझं नाव जर शेखर कृष्णा (SK) असतं तर तुला काही फरक पडला असता का?' लोकांनी तुला धर्मावरुन बोलणं थांबवलं असतं का?


या प्रश्नावर अभिनेता म्हणाला, 'जर मी हिंदू असतो तर माझं नाव शेखर राधा कृष्णा (SRK) असतं... हे नाव मला आवडलं असतं...' अभिनेत्याने दिलेलं उत्तर प्रत्येकाला आवडलं. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. 


वाचा | 'लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र...', Deepika Padokone च्या बिकीनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया


किंग खान पुढे म्हणतो, 'एक कलाकार नेहमी सामाजिक आणि धार्मिक बंधनांच्या पलीकडे विचार करतो. म्हणून तुम्ही मला प्रेमाने कोणत्याही नावाने हाक मारली तरी मला आवडेल.' असं देखील अभिनेता म्हणाला. शाहरुखच्या व्हिडीओवर अनेकांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 



शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात


 'पठाण' (Pathaan) सिनेमात बेशरम रंग (Beshram rang) गाण्यात दीपिकाने घातलेल्या बीकिनीमुळे अभिनेत्री सर्वत्र ट्रोल होत आहे. पठाण (Pathaan) सिनेमातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालणे दीपिकाला चांगलंच महागात पडलं. यावर भाजपसह अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. (ratna pathak husband)


भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत. आजपर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता अभिनेता शहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'पठाण' सिनेमा मोठ्या अडचणीत सापडला आहे.  त्यामुळे आता हा वाद कुठे शमतो, हे पाहावे लागणार आहे.