कामावर परतण्यासाठी शाहरुख खान तयार, मात्र दिग्दर्शकासमोर ठेवली `ही` अट
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचं कुटुंब याआधी अनेक समस्यांमधून गेलं आहे.
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचं कुटुंब याआधी अनेक समस्यांमधून गेलं आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी शाहरुखने सर्वतोपरी प्रयत्न केले. आर्यनला पकडण्यात आलं तेव्हा शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचं शूटिंग करत होता. आपल्या मुलाच्या अटकेची बातमी समजताच तो स्कॉटलंडहून लगेच परतला होता.
शाहरुखने दिग्दर्शकांना विनंती केली
आता सगळं काही पूर्वपदावर आलं आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खान लवकरच पुन्हा एकदा कामावर परतण्याची तयारी करत आहे. बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानने कामावर परतण्यापूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला खास आवाहन केलं आहे. शाहरुख खानने हे आवाहन त्याच्या कुटुंबाला लक्षात घेऊन केलं आहे.
शाहरुख लवकरच 'पठाण'मध्ये दिसणार
किंग खानने दिग्दर्शकाला चित्रपटाच्या शूटिंगला छोट्या तुकड्यांमध्ये विभागण्यास सांगितलं आहे जेणेकरून तो मधल्या काळात त्याच्या घरी येत राहील. शाहरुख खान आपल्या कुटुंबाला किती महत्त्व देतो हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. एक यशस्वी कलाकार, दिग्गज बिझनेसमन आणि कुटुंबासाठी काहीही करू शकणारा कौटुंबिक माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे.
शाहरुख शूटिंग सोडून निघून गेला होता
आर्यन खानचं प्रकरण अद्याप पूर्णपणे सुटलेलं नाही आणि शाहरुख खानच्या मुलाला या दरम्यान एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. इतकंच नाही तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ड्रग्ज प्रकरणामुळे मधेच कोर्टात हजर राहावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शाहरुख खानचा सहभाग असणं अगदी स्वाभाविक आहे.