शाहरुख खानने फोटोच्या नादात म्हाताऱ्या व्यक्तीला ढकलंल; संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद
लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमधून शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर आल्यानंतर लोक शाहरुख खानवर चांगलीच भडकले आहेत.
शाहरुख खानने आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे.. शनिवारी किंग खान 77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार. पारडो अल्ला कॅरीरा किंवा करिअर लेपर्डने सन्मानित होणारा पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला. या सगळ्यात अभिनेता किंग खानचा रेड कार्पेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सिंगल पोज देताना शाहरुख खानने एका ज्येष्ठ व्यक्तीला 'पुश' केल्याचा दावा करण्यात आला आहे. एका X युझरने लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर शाहरुखची क्लिप शेअर केली. यामध्ये शाहरुख खान फोटोग्राफर्सजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीकडे सरकला. शाहरुखने त्या माणसाला हाताने ढकलल्यासारखे मागे ढकलले. फोटो काढताना तो फ्रेममध्ये येऊ नये म्हणून किंग खानने हे केले, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या व्हिडिओवर लोक दोन गटात विभागले गेले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, शाहरुख खानने असे करणे योग्य नव्हते. तर काही लोकांचे म्हणणे आहे की शाहरुखचे हे वागणे योग्य आहे. अशा लोकांचे म्हणणे आहे की, शाहरुखने त्या व्यक्तीला मजेशीर पद्धतीने मागे ढकलले. कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले, त्याने त्या वृद्धाला धक्काबुक्की केली. व्हिडिओ ट्विट करताना, एक युझरने म्हणाला की, शाहरुखने त्या वृद्धाला धक्का दिला!!! शाहरुख खानला लाज वाटली पाहिजे. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने सांगितले की, तो चांगला माणूस नाही हे नेहमी माहीत होते, तो असे नाटक करण्याचा प्रयत्न करतो.
दुसऱ्याने ट्विट केले की, "खरं तर हे खोडकर वर्तन नव्हते तर शाहरुखचा अहंकार होता. जर म्हाताऱ्याने शाहरुखशी असेच केले तर?" शाहरुखसाठीही कुणीतरी असं लिहिलं, नेहमी असभ्य. तो असे वागतो जणू तो सर्वोच्च आणि अमर आहे."
चाहत्यांनी शाहरुखचा बचाव केला
अनेक चाहत्यांनी निदर्शनास आणून दिले की, व्हिडिओमध्ये अभिनेता 'मित्र'सोबत दिसत आहे आणि तो त्या माणसासोबत 'मजा' करत होता. एकाने ट्विट केले की,शाहरुखमजा करत आहे. दुसरा म्हणाला, हो. तो माणूस त्याचा जुना मित्र आहे. ट्विटमध्ये असेही लिहिले होते, तो त्याचा जुना मित्र आहे. शाहरुख खानबद्दल अफवा पसरवू नका.