शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार
Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खाननं `देवदास` चित्रपटाला थेट दिला होता नकार... मग अचानक काय झालं की त्यानंच दाखवली `देवदास` च्या भूमिकेच जादू
Shah Rukh Khan Devdas : 2002 मध्ये संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'देवदास' देखील आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरचा बेंचमार्क ठरला असं म्हणायला हरकत नाही. पण ते असं सगळं करण्यास नकार देत होते. मग असं काय झालं की एका वर्षानंतर त्यानं संजय लीला भन्साळी यांना होकार दिला.
खरंतर जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं की त्याला वाटतं. या चित्रपटाविषयी आता शाहरुख खानचं म्हणणं आहे की त्याला वाटायचं की देवदाससारख्या 'हरलेल्या आणि दारुड्या'ची भूमिका साकारण्याची त्याची प्रतिमा नाही. पण चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी म्हणाले होते की, शाहरुखनं या भूमिकेसाठी होकार दिला तरच ते चित्रपट बनवतील. स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांशी बोलताना भन्साळींच्या शब्दांची आठवण करून देत शाहरुख म्हणाला, 'तू या चित्रपटात नसणार तर मी हा चित्रपट करणार नाही कारण तुमचे डोळे देवदाससारखे आहेत.'
शाहरुखला लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पार्डो अला कैरियरा अवॉर्ड -लोकार्नो टूरिज्म’ नं सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, हा सन्मान मिळणारा तो पहिलाच भारतीय आहे. भारतीय साहित्य आणि चित्रपटाची सगळ्यात लोकप्रिय गोष्टींपैकी एक म्हणजे 'देवदास'. हा चित्रपट शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 1917 च्या कादंबरीवर आधारित आहे. त्यावर आधारित चित्रपट 1936 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा बनवण्यात आला होता, ज्यामध्ये केएल सहगल मुख्य भूमिकेत होते, तर 1955 मध्ये बनलेल्या चित्रपटात दिलीप कुमार यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
हेही वाचा : राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई
आईसोबत थिएटरमध्ये दिलीप कुमारांचा हा चित्रपट पाहण्याविषयी सांगताना शाहरुख म्हणाला, एका अशा मुलाची कहानी होती, जो मद्यपान करतो. तो एका मुलीच्या प्रेमात असून तिला सोडून जातो. शाहरुख तसा नाही आहे त्यामुळे त्याच्यासाठी ही योग्य भूमिका नाही असं त्याला वाटत होतं. दरम्यान, शाहरुखच्या या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षितनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. ऐश्वर्यानं पारो ही भूमिका साकारली होती तर माधुरीनं चंद्रमुखी ही भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे जॅकी श्रॉफनं चुन्नी बाबूची भूमिका साकारली होती.