Jawan Trailer Released Today : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या 'जवान'ची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरुख सध्या व्यस्त आहे. काल शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शाहरुख वैष्णोव देवीच्या देवदर्शनासाठी पोहोचल्याचे दिसते. तर दुसरीकडे आज जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या धमाकेदार ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. चला तर पाहूया जवानचा धमाकेदार ट्रेलर (Shahrukh Khan Movie Jawan Trailer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवानचा ट्रेलर हा 2.46 मिनिटांचा आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला काही व्हिज्युअल्स असून शाहरुख खानचा व्हॉईस ओव्हर आपल्याला ऐकायला येतो. शाहरुख एक कहाणी सांगत बोलतो की एक राजा होता. एका मागे एक सगळ्या युद्ध हरत होता. त्यानंतर जंगलाच उपाशी तपाशी फिरत होता. त्यामुळे तो खूप रागात असतो. यानंतर खरी स्टोरी पाहायला मिळते. मुंबईत हायजॅक ते दमदार अॅक्शन... आणि नयनतारासोबत रोमान्स... इतकंच नाही तर या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण शाहरुखला धोबी पछाड देत असल्याचे पाहायला मिळत आहे. जवान या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. एटलीच्या या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 



या चित्रपटानिमित्तानं नयनतारानं इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. तर तासाभरात तिचे 246K पेक्षा जास्त फॉलोवर्स झाले आहेत. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्यासोबत तिची जुळी मुलं देखील दिसत आहेत. त्यासोबत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की 'सगळ्यांना सांगा मी आली आहे.'


'जवान' या चित्रपटाविषयी उत्सुकता ही भारतीयांप्रमाणेच परदेशातील प्रेक्षकांना देखील आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांच्यानुसार, अमेरिकेत 'जवान'ला 450 पेक्षा जास्त ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत, $225K ची तिकिट विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 'जवान' या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.