Shah Rukh Khan च्या घड्याळाची किंमत इतकी की तेवढ्यात बंगला, गाडी अन् बरंच काही येईल
Shah Rukh Khan नं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुखच्या हातातली घडी पाहून अनेकांनी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर सर्च केल्या होत्या. दरम्यान, शाहरुखच्या या
Shah Rukh Khan Watch Price : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'पठाण' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. शाहरुख हा त्याच्या लॅव्हिश लाइफसाठी देखील ओळखला जातो. त्याचं घर, गाडी पासून सगळ्याच गोष्टी नेहमी चर्चेत असतात. सध्या शाहरुख हा त्याच्या हातात घालायच्या घडाळ्यामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या एका घड्याळ्याच्या किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल.
नेहमीच त्याची स्टाईल आणि लॅविश लाईफमुळे चर्चेत असणारा शाहरुख आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरुख त्याच्या पठाण चित्रपटातील चष्मा आणि शर्टामुळे चर्चेत होता. तर आता शाहरुख त्याची घड्याळ चर्चेत आहे. शाहरुखनं एका कार्यक्रमात निळ्या रंगाची घड्याळ घातली होती. शाहरुखच्या या घड्याळाची किंमत किती हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? या घड्याळ्याची किंमत ही 4.98 कोटी रुपये इतकी आहे. रिपोर्ट्सनुसार, ही घड्याळ Royal Oak Perpetual Calendar आहे. तर Chrono24 वेबसाईटनं दिलेल्या रिपोर्टनं किंमत 4.7 कोटी रुपये आहे.
हेही वाचा : Mahesh Babu च्या मराठमोळ्या पत्नीची खास पोस्ट, म्हणाली,,,
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटानं अवघ्या 15 दिवसात 452.95 कोटींचा गल्ला केला. तर दुसरीकडे sacnilk नं दिलेल्या बातमीनुसार चित्रपटानं 16 व्या दिवशी 6 कोटी रुपयांचे कमाई केली. चित्रपट पाहता प्रेक्षकांना त्याचे क्रेझ लागले आहे. तर हे पाहता काही चित्रपटांनी विकेंडला देखील 5 ते 10 कोटी रुपयांची कमाई केली नाही तर विक डेला पठाण इतकी कमाई करत आहे. आता सगळ्यांना आशा आहे की शाहरुखचा पठाण हा चित्रपट दोन डिजीटमध्ये कमाई करणार आहे.
शाहरुखनं 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. तर पठाणनं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. इतकंच काय चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. त्यानंतर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. दरम्यान, हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय शाहरुख दिग्दर्शक अॅटलीच्या जवान चित्रपटात देखील दिसणार आहे. अलिकडेच शाहरुखचा चित्रपटातील लूक लीक झाला होता. त्याच्या फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तर शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.