Shah Rukh Khanच्या मुलीपेक्षा अधिक सुंदर त्याची भाची; पाहा फोटो
पाहा शाहरूखच्या भाचीचे फोटो...
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थातचं अभिनेता शाहरूख खान आणि त्याचं कुटुंब कायम चर्चेत असतं. त्यांच्या मुलांना देखील सगळेचं ओळखतात. तीन मुलांपैकी शाहरूख आणि गौरीची लेक सुहाना खान तुफान चर्चेत असते. पण आता आम्ही तुम्हाला शाहरूखच्या कुटुंबामधील आणखी एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत. फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. तिचं नाव आलिया छिब्बा असं आहे. तुम्ही आता विचार करत असाल कोण आहे, आलियाचं आणि शाहरूखसोबत तिचं नातं काय?
सर्वप्रथम आलियाचे फोटो आयापीएल दरम्यान लिक झाले होते. ती शाहरूखच्या बर्थडे पार्टीमध्ये देखील आली होती. त्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता होती, ती मुलगी नक्की आहे तरी कोण? जी शाहरूख आणि त्याच्या कुटुंबाच्या इतक्या जवळ आहे. आलिया छिब्बा गौरी खानचा भाऊ विक्रांतची मुलगी आहे. म्हणजे ती शाहरूखची देखील भाची आहे.
आलिया सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. आलिया सर्वप्रथम 2019 साली प्रकाशझोतात आली. तेव्हा सुहाना आणि गौरी, आलियाच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्नात सुहाना, गौरी आणि आलिया पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
आलिया शाहरूख आणि गौरीच्या फार जवळ आहे. ती खान कुटुंबासोबत देखील अधिक वेळ घालवते. आलियाचं लग्न वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी झालं. आलियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. कोरोना काळात तिने स्टायलिश मास्कचं प्रॉडक्शन सुरू केलं. आलिया फार बोल्ड आहे.