मुंबई : बॉलीवूडचा बादशाह, शाहरुख खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, स्पष्टवादी मुद्द्यांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, एकदा एका मुलाखतीत शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनबद्दल असं काही सांगितलं होतं की, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. शाहरुखनं म्हटलं होतं की, आर्यनने सगळ्या चुकीच्या गोष्टी कराव्यात, जो तो स्वत: तरुणपणात करू शकत नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख आणि गौरी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये पोहोचले होते
शाहरुख खान 1997 मध्ये सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये आला होता. या टॉक शोमध्ये गौरीही त्याच्यासोबत पोहोचली. त्यावेळी गौरीने तिचा पहिला मुलगा आर्यनला काही दिवसांपूर्वीच जन्म दिला होता. यानिमित्ताने सिमीने शाहरुख आणि गौरी यांच्याशी त्यांच्या मुलाबद्दलही चर्चा केली होती.


शाहरुखने आर्यनबद्दल धक्कादायक उत्तर दिलं
सिमी ग्रेवालने शाहरुखला विचारलं की तो आर्यनला कसा वाढवणार, ज्यावर त्याने उत्तर दिलं की, आर्यनने ते सगळं करावं जो तो स्वत: टीनएजमध्ये करू शकला नाही. शाहरुख म्हणाला की, त्याला त्याच्या टीनएजमध्ये खूप काही करायचं होतं पण त्यावेळी त्याची ईच्छा असूनही तो करु शकला नाही. कारण त्याच्याकडे इतक्या सुविधा नव्हत्या.


शाहरुख सेक्स आणि ड्रग्ज घेण्यावर देखील म्हणाला
शाहरुख सिमी ग्रेवालला म्हणाला, 'आर्यन 3-4 वर्षांचा झाल्यावर मी त्याला सांगेन की तो मुलींच्या मागे फिरु शकतो, ड्रग्स घेऊ शकतो, सेक्स करू शकतो. मी हे करू शकलो नाही. जर त्याने हे लवकर सुरू केलं तर चांगलंच आहे. आर्यन जर घराबाहेर गेला तर मला आवडेल की मुलींनी येवून त्याची तक्रार केलेली.


सुहानासाठी वेगळे नियम
 मात्र शाहरुखच्या मुलाच्या विधानावरुन शाहरुख मुलगी आणि मुलात भेदभाव करतो हे यावरुन स्पष्ट झालं आहे कारण जेव्हा शाहरुखने एका मुलाखतीत सुहानाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं विधान केलं होतं. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये शाहरूख खानला प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा की,'जर तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केलं तर तू काय करशील?' तेव्हा शाहरूख खानने उत्तर दिलं की,'माझ्या मुलीला डेट करण्यापूर्वी तो मुलगा हजारवेळा विचार करेल. आणि घाबरेल ही.' तसेच उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की,'मी त्या मुलाचे ओढ कापून टाकेन.' यानंतर शाहरूख आणि करण जोहर खूप हसू लागले.


चाहते आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत
आर्यनच्या फोटोवर सोशल मीडियावर खूप लाईक्स केले जातात. आर्यनने आता ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. आणि चाहते त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. शाहरुखची मुलगी सुहानाला अभिनयात रस आहे पण आर्यनला अभिनय करायचा आहे की दिग्दर्शन करायचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.