नेटफ्लिक्सवर लवकरच झळकणार शाहरूख, ट्रेलर प्रदर्शित
शाहरूख खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
मुंबई : बॉलिवूडचा किंग म्हणजेच अनेकांच्या गळ्यातील ताईद असलेला अभिनेता शाहरूख खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु तो लवकरच नेटफ्लिक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शाहरूख लवकरच हॉलिवूड सेलेब्रिटी डेविड लेटरमॅन यांच्या शोमध्ये उपस्थित राहणार आहे. शोच्या चित्रीकरणासाठी ते ईदच्या दिवशी शाहरूखच्या घरी आले होते.
मोठ्या कालावधीनंतर 'माय नेस्ट गेस्ट निड्स नो इन्ट्रोडक्शन' शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. शाहरूखचे मंचावर आगमन होते आणि प्रेक्षक त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतात. त्यावर डेविड म्हणतात, आतापर्यंत माझ्या शोमध्ये असे स्वागत कोणाचेचं झाले नाही.
शाहरूखच्या चाहत्यांची संख्या फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगात त्याचे चाहते पसरलेले आहेत. या शोमध्ये अनेक दिग्गज व्यक्तिंनी उपस्थिती लावली होती. अभिनेता शाहरूख स्टारर या शोचा भाग २५ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.