नवी दिल्ली : ब्रिटनचा विकली न्यूजपेपर ईस्टर्न ऑयने 'सेक्सिएस्ट एशिअन मॅन २०१७' साठी सर्व्हे केला होता. यामध्ये शाहिद कपूरला सर्वाधिक वोट्स मिळाले. 


तीन वर्षे  ऋतिक अव्वल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सेक्सिनेस आणि हॅंडसम लुक्सने शाहिदने  ऋतिकला देखील मागे टाकले आहे. यामध्ये  ऋतिक हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर जायन हा तिसऱ्या स्थानी आहे.


गेली तीन वर्षे  ऋतिक हा या पोल मध्ये टॉप पोजीशनवर आहे. पण यावर्षी शाहिदने त्याला ओवरटेक केल्याचे पाहायला मिळते. 


शाहिदचे ट्विट 


या रिझल्टनंतर आनंदी झालेल्या शाहिदने ट्विट केले आहे.



तो म्हणतो, "वाह!! तुमच्या सर्वांचे खूप आभार. तुमचे प्रेम आणि सहाकार्यामूळेच हे शक्य झाले." 


 


प्रियंका चोप्रा "सेक्सिएस्ट एशिअन वुमेन २०१७"


दीपिका पादुकोनला मागे टाकत प्रियंका चोप्रा "सेक्सिएस्ट एशिअन वुमेन २०१७" बनली आहे. 


काही दिवसांपूर्वी  ईस्टर्न ऑयने यावर्षीच्या 'सेक्सएस्ट एशिअन वुमन २०१७'' पोल देखील घेतला होता. प्रियंकाला यामध्ये सर्वाधिक वोट्स मिळाल्या.