मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आज इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. पण यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. शाहिदने त्याच्या करियरची सुरूवात बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली. त्यानंतर त्याने मागे वळून कधी पाहिलं नाही. 'जब वी मेट' (Jab We Met) आणि 'कबीर सिंह' (Kabir Singh) दोन चित्रपटांमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता देखील तो 'जर्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज  शाहिद प्रसिद्ध अभिनेता असला तरी भूतकाळातल्या काही गोष्टी विसरता येत नाहीत. शाहिदने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या पाठी देखील डान्स केला. त्यानंतर त्याने अभिनेत्री करिष्मा कपूर स्टारर 'दिल तो पागल हैं' चित्रपटातील टायटल गाण्यावर डान्स केला. 



'दिल तो पागल है' त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट. चित्रपटातील गाण्याच्या शूटिंग दरम्यान, शाहिद कपूर अन्य डान्सर्सप्रमाणे डान्स करू शकला नाही. त्यामुळे करिश्मा कपूरला पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावे लागले. त्यामुळे चिडलेली करिष्मा शाहिदला ओरडली. 


15 रिटेक दिल्यानंतर जेव्हा चूक पुन्हा झाली तेव्हा करिश्मा कपूरचा पारा चढला आणि तिने रागाने विचारले की हे कोणाच्या चुकांमुळे होत आहे. करिश्माच्या संतप्त आवाजाने शाहिद घाबरला. त्यानंतर तो सतत अन्य डान्सर्सच्या मागे लपण्याचा प्रयत्न करायचा. 


भूतकाळातील सर्व गोष्टींचा खुलासा त्याने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये केला. कालांतराने शाहिद आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्यांत प्रेमाचा गुलाब बहरला आणि करिष्मा आणि शाहिद यांच्यात मैत्री झाली. 


पण शाहिद-करिष्माची मैत्री जास्त काळ टिकली नाही. कारण शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप झालं. फक्त 5 वर्षं दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आता दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत.