Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. शाहिद त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिदच्या करिअरच्या सुरुवातीला असं काही घडलं की त्याच्या प्रतिमेवर त्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला होता. त्यावेळी शाहिदची गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्री करीना कपूरचा किस करतानाचा त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यासगळ्यामुळे तर खूप मोठा वाद निर्माण झाला होता. शाहिदनं नेहमीच ते फेक असल्याचे सांगितले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर जेव्हा हे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा तो 24 वर्षांचा होता. या घटनेचा त्याच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. असे त्यानं आता एका मुलाखतीत उघड केले आहे. शाहिद याविषयी बोलताना म्हणाला, "त्यावेळी मी उद्ध्वस्त झालो होतो. मी फक्त 24 वर्षांचा होतो आणि मला वाटलं की माझी प्रायव्हसी नाही आणि मी त्याचे संरक्षण करण्यासाठी काहीही करू शकत नाही."



शाहिद याविषयी बोलताना पुढे म्हणाला, पुढे काय होईल असा त्याला प्रश्न पडला होता. त्यामुळे त्याच्यावर याचा खूप वाईट परिणाम झाला असं त्याला वाटू लागलं होतं. शाहिद म्हणाला, त्या वयात आपण स्वतःच्या भावनाही नीट समजू शकत नाही नाही.  तुम्ही एखाद्या मुलीला डेट करता आणि यादरम्यान असे काहीतरी घडते. तर आताच्या परिस्थितीवर शाहिद म्हणाला की आता त्याला या सगळ्याचा फरक पडत नाही. आता तो विवाहित आहे आणि त्याला मुलं आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नाही. तर तो पुढे म्हणाला की आता लोकांकडे 24 वर्षांचे दुसरे तरुण आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यांचे लक्ष आहे. 


हेही वाचा : लहाणपणीच शारीरिक शोषण पाहिले, पण प्रेमात...; Shahid kapoor चा मोठा खुलासा


करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूर हा करीना कपूरला डेट करत होता. त्यादरम्यान दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. दरम्यान, 2007 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले आणि ते विभक्त झाले. त्यानंतर करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले आणि शाहिद कपूरनं मीरा राजपूतसोबत सप्तपदी घेतल्या. शाहिद कपूरने एक अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या आव्हाने आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देत एक अभिनेता होण्यास तो यशस्वी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही.