Viral Shahid Kapoor Meme on Twitter: ट्विटरच्या एलॉन मस्कनं ट्विटरवर मोठा बदल केला आहे. सेलिब्रेटींच्या ट्विटर पेजवर असणारे ब्लू टिक (Bollywood Celebs Blue Tick Removed) हटवण्यात आले आहे. या बॉलिवूड सेलिब्रेटींपैंकी अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा एक आहे. परंतु ट्विटरवर ब्लू टिक काढल्यानंतर शाहिद कपूरला फारसा राग आल्याचे दिसत नसून आता त्यानंही हा बदल एन्जॉय करण्याचे ठरवले आहे. ट्विटर, इन्टाग्रामवर शाहिद कपूर हा सक्रिय असतो. तो आपल्याला चाहत्यांना कायमच अपडेट करतो. सध्या हा ब्लू टीकचं प्रकरण अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे एन्जॉय करताना दिसत आहे. अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) त्यातले एक होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूरनंही एक मीम्स ट्विटरवरच शेअर केलं आहे, सध्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करत हे मीम्स (Viral Meme Kabir Singh) एन्जॉय करताना दिसत आहे. ट्विटरवर सगळ्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. परंतु शाहिदनं मात्र एक भन्नाट मीम सोशल मीडियावर शेअर केले आहे. शाहिदचे ट्विटर आणि इन्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स आहेत. जे त्या नियमितपणे फॉलो करतात. परंतु जेव्हा एलॉन मस्कनं शाहिद कपूरचं ट्विटरवरील ब्लू टीक काढलं त्यानंतर शाहिदनं कबीर सिंग स्टाईलमध्ये एक मीम शेअर केलं आहे. हे मजेदार ट्विट सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (shahid kapoor shares a funny meme after twitter ceo elon musk removes blue tick trending news marathi)


मीम व्हायरल 


काल म्हणजे गुरूवारी (21 एप्रिल) रोजी शाहिदनं ट्विटरवरून हे मीम रिट्विट केलंय. शाहिदनं एक मीम शेअर केलंय आणि त्या मजेदार मीमच्या कॅप्शनमध्ये शाहिद कपूरनं लिहिलंय की, ''माझ्या ब्लू टीकला कोणी हात लावला? एलॉन, तू थांब तिथे, मी येतोय!'' सध्या हे मीम सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालं आहे. त्यामुळे नेटकरी या मीमवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी हे मीम रिट्विट आणि शेअरही केलं आहे. तुम्ही हे मीम अजून पाहिलं नसेल तर नक्की पाहा, तुम्हालाही तुमचं हसू आवरता येणार नाही. गंमतीमध्ये शेअर केलेलं मीम पाहून अनेकांनी शाहिद कपूरच्याही विनोदबुद्धीला दाद दिली आहे आणि सगळ्यांनी हे मीम एन्जॉय केलं आहे. 


कबीर सिंगचा डायलॉग 


2019 साली आलेला कबीर सिंग हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. याच चित्रपटातील एक लोकप्रिय डायलॉग येथे शाहिदनं अगदी योग्य प्रकारे वापरला आहे. यावर शाहिद कपूरही हसला आहे. ट्विटरवर शाहिदचे असंख्य फॉलोवर्स आहेत. 15.4 मिलियन अशी ही फॉलोवर्सची संख्या आहे. 


 


शाहिद कपूर, शाहरूख खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अमिताभ बच्चन, विराट कोहली यांचेही ब्लू टिक हटवण्यात आले आहे. या मीमखाली नेटकऱ्यांच्याही भन्नाट कमेंटस आल्या आहेत.