मुंबई : करण जोहरचा  (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee with Karan) हा चॅट शो नेहमी चर्चेत असतो. या शोमध्ये सेलिब्रिटी येतात आणि त्यांचे अनेक पत्ते ओपन करतात. करणही कलाकारांना आपल्या प्रश्नांतून जाळ्यात ओढतात अनेकदा दिसतो. असाच एक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी  (Kiara Advani) दिसत आहे. यामध्ये शाहिद कपूर (Shahid Kapoor) स्वत:च्या सर्वात सेक्सी  पार्टबद्दल बोलताना दिसत आहे. जे ऐकून कियारा देखील लाजून लाल होता दिसत आहे. शाहिदचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण नेहमीच त्याच्या पाहुण्यांना त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारत असतो. अशातच यावेळी करणने शाहिदला त्याच्या सर्वात सेक्सी पार्टबद्दल विचारलं. या प्रश्नावर उत्तर देत सांगितलं की, जो आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नाहीये तो माझ्या बॉडितला सगळ्यात सेक्सी पार्ट आहे. शाहिदचं हे उत्तर ऐकून कियारा आणि करणसोबतच तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. या एपिसोडचा हा प्रोमो व्हिडिओ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. 


याआधी देखील शाहिद त्याच्या वक्तंव्यामुळे चर्चेत होता. अनेकदा त्याने त्याचे सिक्रेट्स ओपन केले आहेत. त्याची पत्नी मिरा राजपूत सोबत त्याची पर्सनल लाईफ ते करिना कपूरचं रिलेशनशिप असो शाहिद कधीच त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना बिंधास्तपणे दिसला. शाहिद आणि कियारा कबीर सिंह या सिनेमात एकत्र दिसले होते. दोघांच्याही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 


आता पुन्हा एकदा कियारा आणि शाहिद कपूर  गोविंदा नाम मेरा या सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांचा हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज झाली आहे. ज्यामध्ये विक्की कौशल आणि भूमी पेडणेकरच्याही मुख्य भूमिका आहेत. याचसोबत लवकरच कियारा कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात झळकणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याचबरोबर या एपिसोडमध्ये विचारलं असता कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि ते जवळचे मित्र नसून त्यांच्यापेक्षा त्यापलीकडचं नातं असल्याचं कबूल केलं.  शाहिदने असंही जाहीर केलं आहे की, या वर्षाच्या अखेरीस कियारा एक मोठी घोषणा करू शकते जी चित्रपटाबद्दल नसेल. करण आणि शाहिदने सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात डोला रे डोला या गाण्यावर डान्स करण्याचा प्लॅन केला होता.