मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांपेक्षा त्यांचे डायलॉग्स हिट असतात आणि अशा हिट डायलॉग्सवरील मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'कबीर सिंह'चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर लगेचच चित्रपटाचे डायलॉग्स चांगलेच व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर चित्रपटाचा डायलॉग 'नही आऊंगा मतलब नही आऊंगा, बोलाना नही आऊंगा' आणि 'आय एम नॉट अ रिबेल विद आउट अ कॉज' या दोन डायलॉग्जवर जबरदस्त मीम्स व्हायरल होत आहेत. एका यूजरने या डायलॉगवर २३ मे रोजी काँग्रेस भाजपाशी असं बोलताना दिसेल असं म्हटलंय. 



एका यूजरने जेव्हा संपूर्ण ग्रुप 'स्टुडंन्ट ऑफ द इयर २' पाहायला जातो आणि तुम्ही आधीच चित्रपटाचा रिव्ह्यू वाचलेला असतो असं म्हटत ते मीम्स व्हायरल केले आहेत. 



अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात एका दिल्लीतील अतिशय हुशार मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच ट्रेलर पाहिल्यावर शाहिद एक हुशार विद्यार्थी ते गुंड कसा बनतो याबाबत लक्षात येतं. शाहिद कपूर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून 'उडता पंजाब'नंतर शाहिद पुन्हा एकदा ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. 



शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' एक रोमॅन्टिक-अॅक्शन चित्रपट आहे. 'कबीर सिंह' साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा हिट चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शाहिदने या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतली आहे. शाहिदचा चित्रपटातील लूक साउथ हिरो विजय देवरकोंडा यांच्या लूकशी अगदी मिळता-जुळताच आहे. तेलुगुमध्ये हा चित्रपट संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला होता. आता ते या हिंदी चित्रपटाचा रिमेक करत आहेत. 'कबीर सिंह' २१ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.