Shahid Kapoor: शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'देवा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'देवा' हा चित्रपट 31 जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतींसाठी आणि कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. अशातच शाहिद कपूरने राज शामानी यांच्यासोबतच्या मुलाखतीत सलमान खानवर निशाणा साधला आहे. या रिपोर्टमध्ये शाहिदने सलमानबद्दल काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच शाहिद कपूर राज शामानीच्या पॉडकास्टवर दिसला होता. यावेळी अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चा केली. दरम्यान, राज शामानीने त्याला विचारले की तू लोकांना कसं जज करतो किंवा स्कॅन करतो. या प्रश्नाला उत्तर देताना शाहिद कपूरने सांगितले की, मला फक्त चेहऱ्यावरील हावभावावरून समजते. त्याच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटते की तो मला सांगतोय की मी इथे आलो आहे. हे दृश्यमान आहे भाऊ, ते 30 सेकंदात कळते. शाहिदने त्यांची नक्कल केली आणि असा दावा केला की हे सेलिब्रिटी एका खोलीत जातात आणि सर्वांना त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून देतात आणि नंतर त्यांना शांत होण्याची गरज आहे असे म्हटले. यानंतर नेटकरी गोंधळे. त्यांना वाटलं की शाहिद कार्तिक की भाईजानबद्दल बोलत आहे. पण आता यावर शाहिदने स्पष्टीकरण दिलं आहे. 



मात्र, शाहिद कपूरने त्यात कुठेही सलमान खान किंवा कोणाचेही नाव घेतले नाही. पण सोशल मीडियावर लोक त्याचे वक्तव्य आणि चेहऱ्यावरील हावभाव सलमान खानशी जोडत आहेत. एका यूजरने लिहिले, शाहिद कपूरने सलमान खानला फटकारले. खोलीत गेल्यावर अतिप्रसंग न करण्याचा सल्ला दिला. कारण तुम्ही तिथे आहात की नाही यामुळे काही फरक पडत नाही.


शाहिद कपूरकडून अफवेचे खंडन


शाहिद कपूर एचटी सिटीच्या कार्यालयात पूजा हेगडेसह पोहोचला होता. यावेळी त्याने रॅपिड फायर राऊंड दरम्यान, त्याला विचारण्यात आले की, तो सलमान खानवर टीका करत आहे का, त्यावर शाहिदने सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवेचे खंडन केले. म्हणाला की, हा पण मला एक-दोन लोकांनी मेसेज केला होता. पण मी तर असचं बोलत असल्याचे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, जर मला टीका करायची असेल तर ती अशा व्यक्तीवर टीका करणार नाही तो इतका वरिष्ठ आहे. ज्याचा मला खूप आदर आहे.