पहिल्याच जाहिरातीमुळे मिरा कपूर झाली ट्रोल
का झाली मिरा ट्रोल?
मुंबई : शाहिद कपूर आणि मिरा राजपूत या दिवसांत त्यांच्या जीवनात येणाऱ्या एका आनंदाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीरा राजपूत पुन्हा एकदा आई होणार आहे. आई होण्याबरोबरच मिरा राजपूत अभिनयात देखील डेब्यू करत आहे. ती कोणत्या सिनेमांत नाही तर एका अॅड शूटमध्ये दिसणार आहे. मंगळवारीच ही जाहिरात समोर आली आहे. मात्र आपल्या पहिल्याच जाहिरातीमुळे शाहिद कपूरची पत्नी मिरा कपूर ट्रोल झाली आहे.
या जाहिरातीमध्ये मीरा राजपूत एका एंटी एजिंग क्रिमबद्दल सांगत होती. या जाहिरातीत ती मिशाच्या जन्मानंतर तिच्यात आणि शाहिदमध्ये अंतर कमी होण्याचं हे कारण म्हणजे OLAY क्रिम. ही जाहिरात एका एंटी एजिंग क्रिमची आहे. मीरा फक्त आता 23 वर्षाची आहे. मग तिला एंटी एजिंग क्रिमची गरज ती काय? का ती 40 वर्षाची झाली आहे.
23 वर्षाच्या मिराला 40 वर्षाच्या एजिंग क्रिमची जाहिरात का करावीशी वाटली असा सवाल नेटीझन्सनी विचारलं आहे. मिराने आपल्या पहिला बाळानंतर मिशानंतर आणखी एका बाळाचा विचार केला आहे. आणि मिरा लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.