मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर मीरा राजपूत आणि इशान खट्टरचा एक फोटो खूपच व्हायरल होत आहे. ज्यावरुन सतत चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा मीरा राजपूत तिच्या मेव्हण्यासोबत रात्री उशिरा पार्टीसाठी बाहेर पडली. या दोघांना एकत्र पाहून अनेक चर्चा रंगल्या. दोघांचे फोटो लगेचच व्हायरल झाले.


बॉलीवूडमध्ये जर 'देवर-भाभी' यांच्या गोंडस बाँडिंगचा विचार केला तर मीरा राजपूत आणि ईशान खट्टर यांची नावे निश्चितपणे घेतली जातात. याचे कारण असे की सामान्य लोकांप्रमाणेच त्यांच्या नात्यातही खूप प्रेम पाहायला मिळत, सोबतच दोघेही स्टायलिश पद्धतीने एकत्र पार्टी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.


याचच एक उदाहरण म्हणजे ईशान शाहिदच्या अनुपस्थितीत त्याची वहिनी मीरासोबत पार्टीला आला होता. यादरम्यान दोघांनीही कॅज्यूअल लूक कॅरी केला होता.



खरं तर, ही संपूर्ण कथा त्यावेळची आहे जेव्हा मीरा आणि ईशान मुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट सोहो हाऊसमध्ये जेवायला पोहोचले होते. यादरम्यान मीराने नेहमीप्रमाणे स्वत:साठी एक स्टायलिश पोशाख निवडला.


मीराने टॅन ब्राऊन कलरचा जंप सूट घातला होता. त्यावर तिने गोल्डन कानातले घातले होते. ईशानबद्दल सांगायचे तर, कॅज्युअल आउटिंगसाठी, त्याने गडद रंगाची डेनिम जीन्स आणि ग्रे टी शर्ट घातला होता.दोघांचे या पार्टीच्या रात्रीचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.