Shahid Kapoor Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामुळे चर्चेत होता. शाहिदनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या आता तो चर्चेत येण्याचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. शाहिद लवकरच एका हिस्टॉरिकल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शाहिद कपूरनं जॅकी आणि वासु भगनानी यांच्यासोबत एक बिग बजेट चित्रपट साईन केला आहे. आता याविषयी माहिती समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात शाहिद हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते. 


शाहिद साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्टनुसार, "OMG 2 चे दिग्दर्शक अमित राय यांच्याशी शाहिद कपूरचं बोलणं सुरु आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. चित्रपटाचं प्रोडक्शन अश्विन वर्दे करणार आहेत. चित्रपटा संबंधीत सूत्रांनी सांगितलं की गेल्या काही काळापासून शाहिद कपूर आणि अश्विन यांच्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील चित्रपटाला घेऊन चर्चा सुरु आहे. आता पर्यंत सगळं ठीक सुरु आहे आणि जसा प्लॅन करण्यात आला तसं सगळं सुरु आहे." 



दरम्यान, शाहिद आणि निर्माते गेल्या काही काळापासून या चित्रपटासाठी योग्य असलेला दिग्दर्शकाच्या शोधात होते. तर अमित राय यांच्याशी बोलल्यानंतर शाहिद कपूरला वाटतं की भारतीय इतिहासातील एका मोठ्या व्यक्तीची शौर्यगाधा सांगण्यासाठी ते योग्य आहेत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत असणार आहे. पुन्हा एकदा त्यांची शौर्यगाधा ही एका वेगळ्या अंदाजात दाखवण्यात येऊल. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी टॉप स्टूडियोजशी बोलणं सुरु आहे. तर प्री-प्रोडक्शनही सुरु झालं आहे. 


हेही वाचा : कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी


'पिंकव्हिला'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात हा सगळ्यात महागडा चित्रपट असणार आहे. मात्र, या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. तर पेपरवर्क होई पर्यंत चित्रपटाचं नाव फायनल करण्यात येईल असे म्हटले जात आहे. 


'पद्मावत'नंतर शाहिदला पुन्हा एकदा ऐतिहासीक भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. त्या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत होते.