Viral Video : सेलिब्रिटी मंडळींच्या घरी त्यांच्या सेवेलाच अनेक मदतनीस असतात. या सेलिब्रिटींना कसली आली कामं? त्यांच्याकडे असतील शेकड्यानं नोकर... हे असं आपल्यातले अनेकजण म्हणतात. पण, काही सेलिब्रिटी मात्र याला अपवाद ठरतात. कारण, घरातली काही कामं ही मंडीळ स्वत:च करतात. विश्वास बसत नाहीये? युट्यूबवरील एक व्हिडीओ पाहून तुम्हाला ही बाब लगेचच लक्षात येईल. 


दादर फुल मार्केटमध्ये ती आली आणि... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला दादरचं फुल मार्केट माहितच असेल. म्हणजे सणवार कोणतेही असो, दादर फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, फुलं महागली, अमुक फुलाचे दर कडाडले या अशा बातम्या तुमच्या कानांवर येतात. शहराच्या कानाकोपऱ्यातून इथं फुलं घेण्यासाठी अनेकजण येतात. खरेदीदार आणि विक्रीदारांमध्ये सुरु अणारी भावाची घासाघीस, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारची फुलं, त्यातून मध्येच दरवळणारा चाफ्याचा सुवास. कुठेतरी कोपऱ्यात परदेशी फुलं विकणारी मंडळी आणि नजर रोखणारी विविध छटांची गुलाबं. हे असं एकंदर चित्र दादरच्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळतं. 


अशा या फुल मार्केटमध्ये नुकतीच एका सेलिब्रिटीच्या पत्नीनं हजेरी लावली होती. लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी असण्यासोबतच ती विविध जाहिराती आणि फॅशन शो, ब्रँड्ससाठी मॉडेलिंगही करते. या सेलिब्रिटीचं पत्नीचं नाव, मीरा कपूर. 


हेसुद्धा पाहा : VIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'


 


अभिनेता (Shahid Kapoor) शाहिद कपूर याची पत्नी मीरा (Mira Kapoor) सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, नुकताच तिनं You Tube channel वरून एक व्हिडीओ शेअर केला. तिथं शाहिद त्याच्या कामांमध्ये व्यग्र असतानाच इथं मीरा मात्र एक वेगळी ओळख बनवू पाहत आहे. या व्हिडीओमध्ये ती थेट दादरच्या फुल मार्केटमध्ये आल्याचं पाहायला मिळतं. विविध रंगांची, विविध प्रकारची फुलं ती इथं खरेदी करून घरी नेते आणि त्याच फुलांपासून मनमोहक अशी सजावटही करते. 



घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलांच्या नवनवीन रचना करत त्या माध्यमातून एक सुरेख सजावट करणाऱ्या मीरासाठी हे काम म्हणजे मनाला शांतता आणि आनंद देणारं कृत्य ठरतं. इतकंच नव्हे, तर तिच्या या व्हिडीओमुळं चाहत्यांनाही अगदी सहज सोप्या पद्धतीनं घरामध्ये फुलांची सजावट कशी करावी याबाबतच्या काही कल्पनाही मिळत आहेत. काय मग? तुम्ही कधी येताय दादरच्या फुल मार्केटला?