मुंबई : शहनाज गिल (Shannaz Gill) ही  'किसी का भाई किसीकी जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. नुकताच 'किसी का भाई किसीकी जान' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सलमानसोबत शहनाज गिलदेखील मुख्य भूमिकेत आहे. अवघ्या काही वेळातच या ट्रेलरने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. तिचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. नुकत्याचं पार पडलेल्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेत्री पोहचली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे येताच तिने एक मोठं वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बोलताना दिसतेय की, ''आधी स्वत:वर प्रेम करायला शिका मग सलमान खान वैगेरे वैगेर...'' आणि तिथे उपस्थित असलेले सगळेच जोरजोरात हसू लागतात. यानंतर सलमानही शांत बसत नाही. तो पुढे म्हणतो की, वैगरे-वैगरे यानंतर सगले जोर-जोरात हसू लागतात. खूप भारी वाटतं जेव्हा येवढ्या मोठ्या-मोठ्या माणसांमध्ये आज मी उभी आहे.  सगळ्यांनी आप-आपल्या आयुष्या खूप अचिव्हमेंट केली आहे. तो माझ्यासाठी हाच मोठा प्राऊड मोमेंट आहे. की, मी सलमान खानच्या मागे उभी आहे. यानंतर तिला विचारण्यात येत की, 


मी सलमान खानला थँक्यू बोलू ईच्छिते. मी फर्स्ट म्युझिक व्हिडिओसाठी शुटला गेली, तेव्हा त्यांनी मला रिजेक्ट केलं गेलं. मी घरी आले आणि खूप रडू लागले. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की, रडू नकोस बघ एक दिवस तु सलमान खानच्या सिनेमात झळकशील. माझ्या आईने खूप आधी मला माझ्या आईने सांगतलं होत आणि आज सरांनी मला त्यांच्या सिनेमात संधी दिली आहे. की, आईचं बोलणं खरं असतं.''  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान आणि शहनाजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियवर (Vide Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपुर्वी शहनाज सलमान खानच्या घरी पार्टीसाठी पोहचली होती. त्यावेळी सलमान तिला तिच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला होता. ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्या डेटिंगच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या.


ट्रेलर लॉन्चवेळी शहनाजने परिधान केलेल्या या ड्रेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप हॉट अंदाजात दिसत होती.