Dhunki: आपल्या मुलाच्या म्हणजेच आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरूख खान आता लोकांसमोर येऊ लागला आहे आणि त्याच्या नव्या चित्रपटांच्या शुटिंगसाठीही सज्ज झाला आहे. गेले अनेक महिने शाहरूख खानला या ड्रग्ज प्रकरणामुळे मनःस्ताप झाला होता त्यामुळे हे प्रकरण निवळस्तोवर तरी शाहरूख खान हा फारसा कुठेच दिसत नव्हता. मात्र आता तो चांगलाच फॉर्ममध्ये आला असून शाहरूख खान आपल्या 'डंकी' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये आहे. सध्या त्याचे तेथील शुटिंगदरम्यानचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्याभरापासून शाहरूख खान हा आपल्या 'डंकी' या चित्रपटाच्या निमित्ताने लंडनमध्येच आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्याचे अपडेट्स मिळत आहेत. शाहरूखचा मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा त्याचा लंडन येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये चक्क शाहरूख खान आपलं तोंड लपवत त्याच्या कारमध्ये बसताना दिसत आहे. 


हा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला पण शाहरूख असा तोंड लपवत कारमध्ये का बरं बसला याबद्दल त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, लंडनमध्येही शाहरूखला त्याचे फॅन्स स्वस्थ बसू देत नाहीयेत. त्याच्या शुटिंगच्या लोकेशनवर त्याचे फॅन्सही त्याच्याभोवती गराडा करतायत त्यामुळे किंग खानची भलतीच गोची झाली आहे. नुकताच असाच एका प्रकार शाहरूख खानच्या बाबतीत घडला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शाहरूख खान ज्या ठिकाणी लंडनमध्ये शूट करत होता तेथे त्याच्या चाहत्यांनी फोटो आणि सेल्फीचा ससेमिरा लावला. त्यामुळे तिथे शूटिंग पुर्ण करणे अवघड होऊन बसले ्त्यामुळे शाहरूख खानला आपले शूटिंग लोकेशन बदलावे लागले व घाईघाईत तो गाडीत बसून दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे समजते. 


'डंकी' हा चित्रपट राजकूमार हिरानी दिग्दर्शित करत असून पुढच्या वर्षी तो रिलिज होतो आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत तापसी पन्नूही दिसणार आहे.