काजोल आणि शाहरुखबाबत `ही` बातमी होतेय व्हायरल; ऐकून अजय देवगणलाही बसेल धक्का
शाहरुख खान आणि काजोलचं नावे येताच चाहत्यांचे कान टवकारतात.
मुंबई : शाहरुख खान आणि काजोलचं नावे येताच चाहत्यांचे कान टवकारतात. आता काहीतरी घडणार आहे. असं त्यांना वाटू लागतं. आता पुन्हा एकदा नेमकं असंच काहिसं घडलं आहे. अचानक, सोशल मीडिया आणि बॉलीवूडच्या गॉसिप कॉरिडॉरमध्ये बातम्या उडू लागल्या आहेत की, शाहरुख आणि काजोलच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू आहे. ही तयारी इतर कोणी नसून काजोलचा पती अजय देवगण करत आहे.
वाढत्या वयात अजयचं लक्ष आता अभिनयापेक्षा दिग्दर्शक बनण्यावर आहे. दिग्दर्शक म्हणून चार चित्रपट करूनही त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यामुळेच तो आता शाहरुख-काजोलला घेऊन चित्रपट बनवू इच्छितो, जेणेकरून तो हिट होईल.
पण ही बातमी खरी नसून केवळ एक अफवा आहेत. सर्व प्रथम, अजय देवगण त्याच्या पुढील चित्रपट भोलाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानही त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. 2023 मध्ये त्याचे तीन चित्रपट येणार आहेत. पठाण, जवान आणि डंकी. तो एकामागून एक शूटिंग करत आहे. काजोलबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे.
काही दिवसांपूर्वी तिने दिग्दर्शिका रेवतीचा सलाम वँकी हा चित्रपट पूर्ण केला. यानंतर काजोलने करण जोहरच्या 'एंथोलॉजी फिल्म लस्ट स्टोरीज 2' चं शूट पुर्ण केलं आहे. जो ओटीटीवर येईल. तसंच, ती एका वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याची बातमी आहे. ज्याचं शूटिंग सुरू होणार आहे. अशातच तिन्ही कलाकार आपापल्या कामात व्यस्त असून सध्या त्यांच्यासाठी एकत्र येण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. दरम्यान, शाहरुख आणि अजय-काजोलला त्यांच्या मुलांनाही फिल्म इंडस्ट्रीत लाँच करायचं आहे.