मुंबई : बॉलीवूड कलाकार आपल्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड सोबत ठेवतात. मागील काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड चर्चेत होता. त्याच्या पगारामुळे तो चर्चेत आला होता. पण याबाबतीत शाहरुख खानचा बॉडीगार्ड देखील कमी नाही. शाहरुख खान (Shahrukh Khan Bodyguard)च्या बॉडीगार्डची सॅलरी ऐकून अनेकांच्या भूवया उंचावतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानच्या बॉडीगार्ड नाव रवी सिंह (Ravi Singh) आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो किंग खानसोबत आहे. रवी सिंह नेहमी शाहरुखची काळजी घेताना दिसतो. त्यामुळे शाहरुख देखील त्याच्या पगाराच्या बाबतीत काहीही मागेपुढे बघत नाही. त्यामुळे तो बॉलीवूड कलाकारांच्या सर्वात जास्त पगार घेणाऱ्या बॉडीगार्डच्या यादीत त्याची ही नाव आहे. 


डीएनएच्या एका वृत्तानुसार, शाहरुख खानच्या बॉडीगार्डची सॅलरी वर्षाला 2.7 कोटी इतकी आहे. शाहरुखचा बॉडीगार्ड महिन्याला जवळपास 23 लाख रुपये कमवतो. रवी सिंह नेहमी कॅमेऱ्यापासून लांब राहतो. पण शाहरुख सोबत तो नेहमी स्पॉट होतो.


शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) देखील दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद या सिनेमाचा डायरेक्टर आहे. सिनेमात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दीपिका आणि शाहरुख (Deepika And Shahrukh) यांचा हा एकत्र असलेला चौथा सिनेमा आहे.