शाहरूख खान `या` Aliaला करतो फॉलो, सौदर्य पाहून थक्क व्हाल
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो.
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीही चर्चा असतेच. सध्या त्याची मुलगी सुहाना हीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
शाहरूख खान कुटूंबियांसह आलिया नामक एका तरूणीचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ही आलिया बॉलिवूडमधली असल्याचा तुमचा समज झाला असेल तर तसे नाही आहे. ही आलिया खान कुटूंबियांच्या नात्यातली आहे.
सुहानाला एक चुलत बहीण देखील आहे. जी सौंदर्याच्या बाबतीत तिच्यापेक्षा खुप सुंदर दिसते.तिचे संपुर्ण नाव आलिया छिबा आहे. आलिया ही रिलेशनशिपमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरीची भाची आहे. सुंदरतेत ती सुहानालाही मागे टाकताना दिसते.
आलियाचे वय २१ वर्ष आहे. तिने लंडनमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.
विशेष म्हणजे अनेक प्रसंगी आलिया शाहरुखच्या कुटुंबासोबत दिसली आहे. सुहानासोबत अनेक पार्ट्यांमध्येही ती दिसली होती.
आलिया छिबा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. जिथे तिला सुमारे 1 लाख 65 हजार लोक फॉलो करतात.शाहरुख खान व्यतिरिक्त आलियाला गौरी खान, सुहाना आणि आर्यन देखील फॉलो करतात.