Shahrukh Khan's Health News : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (deepika padukone) 'पठाण' चित्रपटामुळे सध्या देशभरात नवा वाद उफाळून आलाय. चित्रपटातील 'बेशरम रंग' (besharam rang) हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपने त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी आता होतेय. या सगळ्यात शाहरुखची तब्येत बरी नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना त्याची चिंता सतावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखनं नुकतंच ट्विटरवर आस्क मी एनिथिंगचा सेशन घेतलं. त्यात त्यानं चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. एक नेटकऱ्यानं शाहरुखला त्याच्या वर्कआऊटविषयी विचारले की त्याला वर्क आऊट करण्यासाछी प्रेरणा कशी मिळते. त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'तुम्ही सलग 7 दिवस व्यायाम करा तुम्हाला सवय लागेल.' दुसरा नेटकरी शाहरुखला पॉपकॉर्न फ्री देण्याची विनंती करत होता. यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'घरून जेवून या.' पुढे तिसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला त्याच्या खाण्या विषयी विचारले आणि म्हणाला तू दिवसभरात काय खातो आणि कशा प्रकारे खातो. यावेळी उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'आता माझी तब्येत थोडी बिघडलीये. मला इन्फेक्शन झालंय त्यामुळे काळजी घेतोय आणि सध्या तरी फक्त डाळ आणि भातच खातोय.'



शाहरुखचं हे ट्वीट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटते. काही चाहत्यांनी त्याच्या ट्वीटवर रिप्लाय देत तुझ्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत असं म्हटलं आहे. दरम्यान, शाहरुखसोबत 'पठाण' या चित्रपटात दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहे. 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


शाहरुख खानने ट्विटरवर #asksrk या सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यानंतर त्याच्या चाहत्यांची शाहरुखवर प्रश्नांचा भडीमार केलाय. किंग खाननेही आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली आहेत. यावेळी शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला सर अशी कोणती कविता किंवा कोट जो ​​तुमच्या मनात वारंवार येते? असे सवाल केला. 


हेही वाचा : Karan Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'


यावर उत्तर देताना शाहरुखने एका कवितेची ओळ लिहीली आहे. 'ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले, ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या," अशा शब्दात शाहरुखने त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं आहे. दरम्यान, 'पठाण' वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना शाहरुखचे हे ट्विट वाचून त्याच्या चाहत्यांनाही हुरुप आला आहे. 


चित्रपटावर बंदीवर काय म्हणाला शाहरुख 


कोलकाता येथे पार पडलेल्या 28 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना शाहरुख खानने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शाहरुख खानच्या एका ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Shahrukh Khan got infected is not well while Pathan Controversy)