Video : `उंच पत्नी नाही...`, Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
Shahrukh Khan and Amitabh Bachchan Viral Video : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या चाहत्यांना देणाऱ्या हटके उत्तर देताना दिसतो. फक्त शाहरुख नाही तर बॉलिवूडचे बिग बी (Amitabh Bachchan) हे देखील त्यांच्या विनोदी प्रतिक्रियेसाठी ओळखले जातात. दरम्यान, त्या दोघांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि अमिताभ एकमेकांचे पाय ओढताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानचा हा व्हिडीओ शाहरुखच्या फॅन पेजनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शाहरुख आणि अमिताभ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला आहे. खरंतर हा व्हिडीओ खूप जुना आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि अमिताभ दोघेही दिसत आहेत. दोघांनी करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या व्हिडीओत दोघेही एकमेकांची खेचताना दिसत आहेत.
व्हिडीओत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एका काऊटवर बसल्याचे दिसते. यावेळी त्या दोघांनी काळ्या रंगाचे सुट परिधान केले आहेत. यावेळी करण जोहर अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारतो की शाहरुख खानकडे अशी कोणती गोष्ट नाही आहे जे तुमच्याकडे आहे? त्यावर उत्तर देत अमिताभ माझी उंची असं उत्तर देतात. यानंतर शाहरुख आणि तेथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागतात. त्यानंतर करण शाहरुख खानला प्रश्न विचारतो की तुझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी अमिताभ बच्चन यांच्याकडे नाही? त्यावर मजेशीर उत्तर देत शाहरुख बोलतो की उंच पत्नी. शाहरुखनं दिलेलं हे उत्तर ऐकताच अमिताभ बच्चन शांत होतात.
हेही वाचा : लग्झरी गाडी सोडून Twinkle Khanna नं लेकीसोबत केला रिक्षातून प्रवास, नेटकरी कौतुक करत म्हणाले...
दरम्यान, शाहरुख लवकरच 'पठाण' (Pathaan) या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाहरुख हा चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्यात दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाशिवाय जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे हक्क ओटीटीला 100 कोटी रूपयांना विकले गेले आहेत. अॅमेझॉन प्राईमचा (Amazon Prime) हा करार शनिवारी निश्चित झाल्याचे समजते आहे. पण हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलिज होईल याची अद्यापही माहिती आली नाही. हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्चला किंवा एप्रिलला प्रदर्शित होऊ शकतो.