Shah Rukh Khan Biggest Fan: जर तुम्ही एखादी गोष्ट मनात ठरवली तर संपूर्ण जग तुम्हाला मदत करते. असच काहीसे शाहरुख खानच्या जबरा फॅनसोबत घडलं. हा जबरा फॅन गेल्या 95 दिवसांपासून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याची वाट पाहत होता. तो कधी शाहरुख खानला भेटेल असं त्याला वाटत होते. शेवटी शाहरुख खानची नजर त्या चाहत्यावर पडली. झारखंडवरून आलेल्या चाहत्याची शाहरुख खानने भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शाहरुख खानचा आणि झारखंडवरून आलेल्या जबरा फॅनचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


95 दिवसांनंतर शाहरुखने घेतली जबरा फॅनची भेट


झारखंडमधील शाहरुख खानचा जबरा फॅन शाहरुख खानला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. 95 दिवसांपासून तो शाहरुख खानला भेटण्यासाठी मन्नत बंगल्याबाहेर वाट पाहत होता. रिपोर्टनुसार, 2 नोव्हेंबरला शाहरुख खान त्याच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आला होता. त्यावेळी अंसारी आणि शाहरुख खान एकमेकांना भेटले. 



शाहरुख खानला भेटण्यासाठी बंद केलं काम


शाहरुख खानच्या या जबरा फॅनने शाहरुख खानला भेटण्यासाठी काम बंद करून झारखंडमधून मुंबईत पोहोचला होता. त्याच्या मनात फक्त एकच इच्छा होती की, शाहरुख खानला एकदा समोरून बघायची. एका मुलाखतीत अंसारीने सांगितले होते की, तो सर्व काम बंद करून शाहरुख खानला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. मन्नत बाहेर एक महिन्यापेक्षा जास्त दिवस तो शाहरुख खानची वाट पाहत होता. त्यानंतर 95 दिवसांनंतर शाहरुख खानने जबरा फॅनची भेट घेतली. 



शाहरुख खानची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट 


शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता. त्याच दिवशी शाहरुख खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये शाहरुख खानने सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आणि हा दिवस स्पेशल बनवला. जे लोक या ठिकाणी माझ्यासाठी आले त्यांच्यासाठी खूप खूप प्रेम.