मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि निर्माता करण जोहर यांनी एकत्र येऊन रसिकांना एक खास आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटर व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून शाहरूख 'इत्तफाक' या आगामी चित्रपटाचा आनंद घ्या पण त्यामधील सस्पेन्स शेअर करू नका' असा संदेश देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अनेकांना चित्रपटातील खरी मज्जा ती पाहण्याआधीच इतरांना सांगून टाकायची सवय आहे. अशा 'स्पॉयलर'च्या सवयीमुळे सिनेसृष्टीचं नुकसान होत असल्याचे शाहरूखने सांगितले आहे.  



 


जसा बाहुबली पाहण्याअगोदर 'कटप्पाला कोणी मारले?' हे सांगणं चुकीचं आहे. तसेच 'इत्तेफाक'मधील मज्जा देखिल कोणाला 'स्पॉयलर' होऊन सांगू नका. 


शाहरूख आणि करण जोहरने एकत्र येऊन 'इत्तफाक' ची निर्मिती केली आहे. शाहरूखच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' आणि धर्मा प्रोडक्शन या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. 


इत्तफाक चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.