मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सध्या 'झिरो' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेक दिवसांपासून शाहरूख आपला वेळ या सिनेमाकरता देत आहे. असं असताना आता शाहरूखच्या खाजगी आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट समोर आली आहे. या गोष्टीने शाहरूखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख 'झिरो'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र यातून मोकळा वेळ मिळाल्यावर शाहरूख आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत होता. शाहरूख अनेकदा आपल्या चाहत्यांनी मोकळ्या वेळात गप्पा मारत असतो. आता इंस्टाग्रामवर आलेल्या एका ट्रेंडमध्ये तुम्ही कोणतेह प्रश्न विचारू शकता. यावर शाहरूखने हॅश टॅग आस्क एसआरके (#AskSRK) असं सेशन सुरू केलं. यामध्ये शाहरूखने आपलं आयुष्य, गौरी खान, अबराम यांच्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. 


यावेळी एका फॅनने शाहरूखला, तू एवढ्या लवकर हा लग्न केलंस? असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर देताना शाहरूख म्हणतो की, भाई, प्रेम आणि लक कधीपण येतं. माझ्या आयुष्यात दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. तर दुसऱ्या फॅनने शाहरूखला विचारलं की, तू आतापण इतका फिट कसा आहेस. तेव्हा शाहरूख म्हणाला की, मी स्मोकिंग नाही करत. दिवसातून 10 तास झोपतो. आणि कधीच खोटं बोलत नाही. तर तिसऱ्या फॅनने विचारलं की, सलमान खानला काय बोलशील तर तो म्हणाला की, 'भाई'