मुंबई : Drugs case प्रकरणी कारागृहात असणाऱ्या आर्यन खानविषयी दर दिवशी नवी माहिती समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतल्यानंतर त्याची पाठवणी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. न्यायालयानीं आर्यनचा जामीन अर्ज नाकारल्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. आता कारागृहातूनच आर्यनसंबंधीची नवी माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर आर्यन अतिशय तणावात दिसला. ज्यानंतर तेथील काही अधिकाऱ्यांनी त्याला पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला. त्याला कारागृहातील ग्रंथालयातून काही पुस्तकंही देण्यात आली. मागील दोन दिवसांपासून आर्यन, राम आणि सीतेवर आधारित काही पुस्तकं वाचत आहे. याआधी त्यनं ‘द लायन्स गेट’ हे पुस्तकही वाचलं.


कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार कोणत्या कैद्याला हवं झाल्यास त्याच्या नातेवाईकांकडून त्याच्या आवडीचं पुस्तकही मागवण्यात येतं. पण, इथं फक्त धार्मिक पुस्तकांनाच परवानगी आहे. कैदी कारागृहातून मोकळा होऊन बाहेर जात असताना त्यानं स्वइच्छेनं तिथे ठेवलेल्या पुस्तकांचा तेथील ग्रंथालयात समावेश करण्यात येतो.


सध्या आर्यनची सुटका नेमकी कधी आणि कशी होणार यावर प्रश्नचिन्हंच आहे. एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या सगळ्यामध्ये आता, अभिनेत्री अनन्या पांडे हिचंही नाव समोर आलं असून, यामध्ये आता नवे खुलासे होऊ लागले आहेत.