मुंबई : शाहरुख खानची स्टाईल इंडस्ट्रीत सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. त्याच्या स्टाईलवर चाहते  फिदा आहेत. जेव्हा संपूर्ण जग शाहरूखसाठी वेडे आहेत. तेव्हा त्याची मुलं मागे कशी राहतील. अलीकडेच गौरी खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा लहान मुलगा अबरामचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अबराम खूपच क्यूट दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निळ्या टी-शर्टमध्ये डर्ट बाईकवर बसलेला अबराम त्याचे वडील शाहरुख खानप्रमाणेच केस फिरवताना दिसत आहे. त्याची स्टाइल पाहून चाहते वेडे झाले आहेत. आज अबरामचा वाढदिवस आहे आणि या खास प्रसंगी गौरी खानने हा व्हिडिओ शेअर केला आहे.


गौरी खान आणि शाहरुख खानचा सर्वात लहान मुलगा अबराम खान आज 9 वर्षांचा झाला आहे आणि या खास प्रसंगी आई गौरी खानने तिच्या इन्स्टा हँडलवर आपल्या मुलाचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  तो शाहरूखप्रमाणेच केस फिरवताना दिसत आहे. अबरामच्या या क्यूट स्टाइलला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ पाहताना एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, काय आहे, अबराम किती क्यूट आहे, तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत म्हटलंय की,  तो किंग खानसारखा दिसतोय. तर अजून एका युजरने कमेंट करत लिहिलं की, तो लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. याआधी देखील अबरामचा एक व्हिडिओ समोर आला होता जेव्हा तो पापाराझींसमोर पोज देताना दिसला होता.