शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अंडरवर्ल्डकडून धमक्या?
बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान नेहमीच त्याच्या मस्त स्टाईलसाठी ओळखला जातो.
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान नेहमीच त्याच्या मस्त स्टाईलसाठी ओळखला जातो. मात्र त्याने ज्या पद्धतीने आपल्या हुशारीचा वापर करून गँगस्टरच्या धमक्यांपासून दूर राहण्यासाठी जे केलं त्यावरून तो कठीण प्रसंगातही आपला तोल सांभाळत असल्याचं दिसून येतं.
अनुपमा चोप्राने तिच्या 'किंग ऑफ बॉलीवूड: शाहरुख खान अँड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात शाहरुख खानला गँगस्टरच्या धमक्यांचा सामना करावा लागला तेव्हा अशा अनेक वाक्यांचा उल्लेख केला आहे. शाहरुख खान नेहमीच गँगस्टरशी सामना करताना इंग्रजीचा वापर करत असे.
अबू सालेम शाहरुख खानवर रागावला होता
शाहरुख खानचा गँगस्टर्सच्या दुनियेतला पहिला संपर्क महेश भट्टच्या 'डुप्लिकेट' चित्रपटादरम्यान झाला होता. त्याआधी जानेवारी 1997 मध्ये टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच महिन्यात महाराष्ट्राचे माजी डीजीपी राकेश मारिया यांनी महेश भट्ट यांना फोन करून सांगितलं की, शाहरुख खानच्या मर्डरची सुपारी गँगस्टर अबू सालेमने शार्प शूटरला दिली होती.
शाहरुख खानने आपल्या जवळच्या निर्मात्यांचा चित्रपट साईन न केल्याने अबू सालेम नाराज होता. मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला त्याच्या सुरक्षेततेसाठी बॉडीगार्ड मोहन भिसे दिले. शाहरुखला जास्त बाहेर न जाण्यास सांगण्यात आलं आणि दररोज त्याची कार आणि मार्ग बदलण्यास सांगण्यात आले.
क्रिकेटरच्या लग्नात शाहरुखसोबत घडली ही घटना
शाहरुख खानने सांगितलं की, त्या काळात अशी स्थिती होती की, प्रसिद्ध क्रिकेटरच्या लग्नात जेव्हा एक चाहता त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला आणि त्याने पेन काढला, तेव्हा त्याला वाटलं की तो चाहता शस्त्र काढतोय आणि त्याने पत्नी गौरीला मागे ढकललं. त्याला असं वाटत होतं की, आपल्यावर गोळी झाडली जाणार नाही त्यामुळे त्याला पत्नी आणि मुलांची काळजी वाटत होती.
अबू सालेमने शाहरुखला फोनवर शिवीगाळ केली
एके दिवशी 'दिल तो पागल है' चं शूटिंग संपवून शाहरुख खंडाळ्याहून येत असताना त्याला अबू सालेमचा फोन आला. सालेमने त्याला हिंदीत शिवीगाळ केली आणि शाहरुख संपूर्ण वेळ शांतपणे इंग्रजीत बोलत राहिला. शाहरुखने मुस्लिम निर्मात्यासोबत चित्रपट न केल्यामुळे तो त्याच्यावर नाराज असल्याचं सालेमने सांगितलं. शाहरुखने आपल्या धर्मातील लोकांना पाठिंबा द्यावा, असं सालेमनं म्हटलं आहे.
अबू सालेमला किं खानचं उत्तर
त्यानंतर शाहरुखने सांगितलं की, त्याने मन्सूर खान, अब्बास मस्तान, अझीझ मिर्झा यांच्यासोबत काम केलं आहे आणि महेश भट्टची आई देखील मुस्लिम होती. शाहरुख पुढे म्हणाला की, त्याने अबू सालेमला सांगितलं की, "जेव्हा मी तुला कोणता चित्रपट करायचा हे सांगत नाही, तेव्हा तू मला कोणता चित्रपट करायचा हेही सांगू नकोस." यानंतर सालेमने शाहरुखला कोणतीही धमकी दिली नाही.