मुंबई : आपले आवडते सेलिब्रिटी कुठे दिसले की आपण लगेच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धावताना दिसतो. बऱ्याचवेळा याचा सेलिब्रिटींना त्रास होतो आणि ते संतापल्याचे पाहायला मिळते. असाच काही तरी प्रकार हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) घडला. मुंबई विमानतळावरचा शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ रविवारी सायंकाळीचा आहे. यावेळी शाहरुख मुंबई विमानतळावर असताना एका चाहत्यानं त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. चाहत्याचे हे कृत्य पाहिल्यानंतर शाहरुखला राग आला. शाहरुख त्याची मुलं आर्यन आणि अबरामसोबत दिसत आहे. शाहरुखला जेव्हा चाहत्याचा राग आला तेव्हा आर्यननं त्याला सांभाळलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओत शाहरुखनं पांढऱ्या रंगाचं जॅकेट आणि काळ्या रंगाच जॅकेट परिधान केलं आहे. आर्यननं निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. अबरामनं लाल रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. 


या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, 'लोकांना पर्सनल स्पेसचा अर्थ कधी समजेल..? तुम्ही त्याला भडकवता आणि जेव्हा तो रिअॅक्ट करतो तेव्हा तो अपमानित होतो. एक चाहता म्हणून आपणही आपल्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत.


शाहरुख खान सगळ्यात शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी होऊ शकला नाही. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) दिसणार आहेत. याशिवाय नुकताच त्याच्या 'जवान' हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि साऊथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) देखील दिसणार आहेत.