मुंबई : Tarak Mehta New innings :लोकप्रिय हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta ka Ulta Chashma) या टीव्ही शोला तारक मेहता अर्थात शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी बाय बाय केले आहे. त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोला का बाय बाय केले, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी हा सोडल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, आता ते नव्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे त्याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिकेला बाय बाय केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. गेल्या महिनाभरापासून तारक मेहता अर्थात शैलेश लोढा हे कोणत्याही मालिकेचे शूटिंग करत नाहीत. त्यांच्यात काही वाद निर्माण झाला आहे का? मालिकेचे सर्वेसर्वा असित मोदी यांच्याशी काही वाद झाला आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, यावर असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


दरम्यान, नुकतीच शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्याबद्दल एक नवीन गोष्ट समोर आली आहे की ते गेल्या आठवडाभरापासून मुंबईत एका नवीन शोचे शूटिंग करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, शैलेश हे हा नवीन शो होस्ट करताना दिसणार आहे.


एका टीव्हीच्या वृत्तानुसार, शैलेश लोढा जूनपासून शेमारु टीव्हीवर सुरु होणारा शो होस्ट करणार आहे. हा शो पोएट्री शोवर आधारित आहे. या शोच्या माध्यमातून नवोदित कवींना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. शैलेश लोढा गेल्या आठवड्यापासून या शोचे शूटिंग करत आहेत. या शोचा प्रोमो लवकरच लॉन्च होणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे. याचे काही फोटो समोर आले आहेत.



काय म्हणाले असित मोदी?


असित मोदी म्हणाले,  माझे सर्व कलाकार या शोमध्ये 10 वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. मला माहित नाही की शैलेश लोढा यांना शो सोडायचा आहे की नाही. जर त्यांना काही अडचण असेल तर मी नक्कीच त्यांच्याशी याबद्दल बोलेन. सध्या मी शो अधिक आनंदी कसा बनवायचा यावर लक्ष केंद्रित करत आहे?



दरम्यान,  शैलेश लोढा यांनी शो सोडण्यावर मौन बाळगले आहे. त्यांनी आतापर्यंत मीडियाशी काहीही माहिती शेअर केलेली नाही. दरम्यान, शोमधील इतर सहकारी कलाकारांना हे देखील माहित नाही की ते शो सोडण्याचा विचार करत आहेत की नाही.