मुंबई : सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा कलाकारांचा प्रवास सोपा नसतो. आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी त्याच्या सुरुवातीच्या आणि संघर्षाच्या दिवसांपर्यंतची माहिती देत याचा प्रत्यय सर्वांपुढे ठेवला आहे. ही झगमगणारी दुनिया अनेकांना आपल्याकडे आकर्षित करते खरी, पण तिथंही काही उणिवा आहेतच. 'शक्ती अस्तित्व के एहसास की' या मालिकेतील अभिनेत्री सोनम अरोरा (sonam arora) हिनं तिचे काही अनुभव सांगत कलाजगताचं वेगळं चित्रं सर्वांपुढे आणलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक वेळ अशी होती की खिशात खाण्यापुरताही पैसे नव्हते, असं सांगत सुरुवातीच्या काळात अभिनयाच्या या विश्वात मला कामच मिळालं नव्हतं, असं सोनमनं सांगितलं. ज्यानंतर तिनं लहानसहान भूमिका साकारण्यास सुरुवात केली. यासाठी तिला 1-2 हजार रुपये मिळू लागले आणि कमाईचा ओघ सुरु झाला. 


सोनमनं कास्टिंग काऊचचाही सामना केला होता. ज्याबाबत सांगताना ती म्हणाली, 'ऑडिशन्समध्ये मी कास्टिंग काऊचचाही सामना केला होता. इंडस्ट्रीमध्ये याला कोणीही चुकलं नाही. कास्टिंग काऊच सर्वच ठिकाणी अस्तित्वात आहे. मुलीच नव्हे, तर मुलांचंही शोषण केलं जातं.'


डान्सनं भुरळ घालणारा टायगर बनला जादूगर; पाहा जबरदस्त व्हिडीओ 


 


आपण मात्र कलेच्याच बळावर काम मिळवण्यावर विश्वास ठेवला असं सांगत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आी- वडिलांची मोलाची साथ मिळाल्याचं सोनमनं सांगितलं. या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या सोनमनं संघर्षाचेही दिवस पाहिले, ज्यानंतर आता तिच्या वाट्याला मालिकांमधील काही तगड्या भूमिका येऊ लागल्या. आत्मविश्वाच्याच बळावर तिनं इथपर्यंत मजल मारली आणि यापुढेही आपण असेच पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त केला.